सांगली : अपघातातून लवकर बरे व्हावे म्हणून चक्क रस्त्यावर बोकडाचा बळी! विट्यातील धक्कादायक प्रकार | पुढारी

सांगली : अपघातातून लवकर बरे व्हावे म्हणून चक्क रस्त्यावर बोकडाचा बळी! विट्यातील धक्कादायक प्रकार

विटा; पुढारी वृत्तसेवा : अपघातातून लवकर बरे व्हावे म्हणून म्हणून बोकडाचे मुंडके आणि दोन पाय शिवाय नारळ, रोट्या, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली असले साहित्य टाकल्याची घटना घडली. ही घटना विटा-कराड राष्ट्रीय महामार्गावर घडली. अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी आणि पुरोगामी सांगली जिल्ह्याला काळीमा फासणारी घटना विट्यात घडल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी होत आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, विटा ते कराड राष्ट्रीय महामार्गावर मध्यवर्ती चौकापा सून साधारणपणे दीड किलोमीटर अंतरावर श्वेता स्टील हे फर्निचरचे दुकान आहे. मंगळ वारी रात्री साडेनऊच्या सुमारास एक चार चाकी गाडी आली, त्यातून दोन व्यक्ती खाली उतर ल्या. एकाच हातात बोकडाचे पिल्लू (कोकरू) होते आणि त्यांनी त्या पिल्लाला खाली पाडून तिथेच त्याच्या मानेवर सूरी फिरवली. त्यावर ते काहीक्षण ओरडून निपचित पडले, तसे त्याचे मुंडके आणि गुडघ्यापासून खालचे पुढचे दोन पाय धडा वेगळे केले आणि एका वर्तमान पत्राच्या कागदावर नारळ, रोट्या, तांदूळ, औषधाच्या गोळ्या,एक अंडं, काजळ, पावडर, लिंबू, दारूची बाटली असले साहित्य ठेवले आणि त्या व्यक्ती पसार झाल्या. ही घटना इतक्या विद्युत वेगाने घडली की शेजारी भांडी घासणार्‍या एका महिलेला दिसली. तशी ती महिला जोरात ओरडून अक्षरशः गांगरून गेली आणि जागीच बेशुद्ध पडली. घरातील अन्य व्यक्तींनी तिला उठवून विचारले असता तिने समोर पाहिलेले दृश्य सांगितले त्यावेळी एखाद्या लहानग्याचा नरबळी दिला की काय? अशी भीती त्या घरातील लोकांना वाटली. त्यांनी लगेच सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगार देवे यांच्याशी संपर्क साधला आणि घडलेली हकीकत सांगितली. त्यावर भिंगारदेवे तिथे तात्काळ घटनास्थळी आले. त्यांनी प्रत्यक्ष येऊन पाहणी केली असता त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेच पोलिसांना बोलावले. त्यानंतर हा सर्व प्रकार पोलिसांच्याही निदर्श नास आला. त्यावर भिंगारदेवे यांनी जादूटोणा प्रतिबंध कायद्यानुसार संबंधित दोघा व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र त्या वर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.

याबाबत विवेक भिंगारदेवे यांनी सांगितले की, प्रारंभी आम्हाला हा करणीचा किंवा तत्सम अंधश्रद्धेचा प्रकार वाटला. परंतु आम्ही सकल चौकशी केली असता असला प्रकार करणाऱ्या दोन व्यक्ती या सरकारी कर्मचारी असून चार वर्षांपूर्वी त्यातील एकाचा अपघात याच ठिका णी झाला होता. त्यातून तो अद्यापही पूर्णपणे बरा झालेला नाही. त्यामुळे पुन्हा आपला अपघात या ठिकाणी होऊ नये किंवा झालेल्या अपघातातून आपण तात्काळ बरे व्हावे या अंधश्रद्धेपोटी असला प्रकार केल्याची कबुली आपल्याजवळ दिल्याचे श्री भिंगारदेवे यांनी सांगितले. मात्र या अघोरी प्रकारानंतर परिसरा तील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर सामाजिक कार्यकर्ते विवेक भिंगारदेवे यांनी याप्रकरणी संबंधितांवर अंधश्रद्धा आणि जादूटोणाविरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे.

Back to top button