पंतप्रधानपदाची उमेदवार बनली आई; गर्भवती असतानाही केला प्रचार | पुढारी

पंतप्रधानपदाची उमेदवार बनली आई; गर्भवती असतानाही केला प्रचार

बँकॉक : वृत्तसंस्था : थायलंडमध्ये १४ मे रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील मजबूत दावेदार पिटोंगर्न शिनावात्रा (वय ३६) ऊर्फ उंग इन यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. उंग यांनी स्वतःच बाळासह स्वत:चा फोटो सोशल मीडियावर शेअर केला.  मुलाचे नाव थासीन ठेवले आहे. उंग यांनी गर्भवती असतानाही दणकून प्रचारसभा घेतल्या होत्या.

फेयू थाई हा पक्ष विजयाचा प्रबळ दावेदार असून, या पक्षाने उंग यांना आधीच पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहे. वडिलांचे सरकार उलथवले २००६ मध्ये उंग यांचे वडील थाक्सिन शिनावात्रा आणि २०१४ मध्ये त्यांच्या काकू यिंगलक यांची सरकारे त्या- त्यावेळी लष्कराने बरखास्त केली होती. उंग यांचे वडील थाक्सिन या देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. २००१ मध्ये ते मोठा विजय मिळवून देशाचे पंतप्रधान बनले होते. लष्कराने नानाविध आरोप केल्याने २००८ मध्ये थाक्सिन यांनी देश सोडला होता.

हेही वाचा : 

Back to top button