Sharad Pawar News | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कमी पडले! त्यामुळे शिवसेना फुटली | पुढारी

Sharad Pawar News | उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून कमी पडले! त्यामुळे शिवसेना फुटली

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शरद पवार (ncp leader sharad pawar) यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या राजकीय आत्मकथेची सुधारित आवृत्ती मंगळवारी प्रकाशित करण्यात आली. त्यात शरद पवार यांनी अनेक गुपिते उघड केली आहेत. उद्धव ठाकरे यांच्याबाबतही शरद पवार यांनी पुस्तकात टिप्पणी केली आहे. काही मुद्द्यांवर त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळतानाच त्यांच्या मंत्रालयात न जाण्याबाबत नाराजीही मिळविली आहे. (Sharad Pawar News)

मुख्यमंत्री झाल्यावरही उद्धव ठाकरेंनी पँट-शर्टमध्ये वावरणे हे एक अप्रूप होते. कोरोना काळात त्यांनी फेसबुकद्वारे साधलेला संवाद जनतेला फारच भावला होता. सामान्य मुंबईकरांत व सरकारी कर्मचार्‍यांत ठाकरेंबाबत आपुलकी होती. ठाकरेंना काही शारीरिक समस्यांमुळे अडचणी आल्या तरी मंत्रालयात दोनदा जाणे आमच्या पचनी पडणारे नव्हते. आघाडीसाठी मी पुढाकार घेतल्याने त्याचे जनकत्व व पालकत्व माझ्याकडे होते. या नात्याने मी त्यांच्याशी बोलायचो. त्याची कार्यवाही ते करायचे; पण राज्याचे प्रमुख म्हणून ते कमी पडले. राज्याच्या प्रमुखाला सर्व बित्तंबातमी हवी. त्याचे यावर बारीक लक्ष हवे; पण अनुभव नसल्याने त्याची कमतरता जाणवली. त्यामुळे शिवसेनेतील फूट टाळण्यात ते कमी पडले, असे भाष्य पवारांनी केले आहे.

 हे ही वाचा :

Back to top button