नवी मुंबईतील कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर: गणेश नाईक | पुढारी

नवी मुंबईतील कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर: गणेश नाईक

ठाणे: पुढारी वृत्तसेवा : एखाद्याने इच्छा व्यक्त करणे गुन्हा आहे का?, मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका घेतलेली आहे. त्यात नाराजी कार्यकर्त्यांमध्ये होती, ती हळूहळू कमी केली आहे. नाराजी पूर्णपणे दूर केली जाईल. मोदी यांच्यासाठी ४८ जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत, असे भाजप नेते व माजी मंत्री गणेश नाईक यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली हस्तांदोलन झाले, आणि चांगले काम करण्याचे निश्चित झाले आहे. ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत नाराजी नाट्य दिसून आले. संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी, यावरुन अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते. मीरा भार्इंदर आणि ठाण्यातही हे लोन आल्याचे दिसून आले.

परंतु, ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची तत्काळ समजूत काढण्यात आली. परंतु, नवी मुंबईतील पदाधिकारी नाराज असल्याचे दिसून आले होते. त्यामुळे म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी नाईक कुटुंब येतील का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला होता. परंतु, रात्री उशिरा त्यांची नाराजी वरिष्ठांनी दूर केल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर शुक्रवारी गणेश नाईक, संजीव नाईक, सागर नाईक आणि संदीप नाईक आदींनी हजेरी लावली होती. यावेळी गणेश नाईक यांनी मोदींसाठी काम करायचे असल्याचे स्पष्ट केले.

हेही वाचा 

Back to top button