Myanmar airstrike : म्यानमारमधील गावावर झालेल्या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक ठार | पुढारी

Myanmar airstrike : म्यानमारमधील गावावर झालेल्या हवाई हल्ल्यात १०० हून अधिक ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : म्यानमारच्या सैन्याने मंगळवारी ( दि.११) केलेल्या हवाई हल्ल्यात अंदाजे  १०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. म्यानमारमधील लष्करी राजवटीच्या विरोधकांनी आयोजित केलेल्या समारंभावर हा हल्ला करण्यात आला आहे. या समारंभात लहान मुलांसह १०० लोक ठार झाले आहेत. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, म्यानमारच्या सैन्याने एका गावावर प्राणघातक हवाई हल्ल्याची पुष्टी केली आहे. (Myanmar airstrike)

Myanmar airstrike : गर्दीवर बॉम्ब टाकला

माहितीनूसार, स्थानिक लोकशाही समर्थक गट आणि  मीडियाच्या सदस्यांच्या मते, देशाच्या विरोधी चळवळीचे स्थानिक कार्यालय उघडण्यासाठी सागिंग प्रदेशातील कानबालू टाउनशिपमधील पाझिगी गावात १५० हून अधिक लोक जमले होते. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास, एका लढाऊ विमानाने थेट लोकांच्या गर्दीवर बॉम्ब टाकला, परिणामी ३० पेक्षा जास्त मुलांसह १०० हून अधिक लोक ठार झाले आहेत. असे एका प्रत्यक्षदर्शीने नाव न सांगण्याच्या अटीवर असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे.

यूएन कडून हल्ल्याचा निषेध 

संयुक्त राष्ट्रांनी म्यानमारच्या सशस्त्र दलाने केलेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक म्हणाले, जखमींना वैद्यकीय उपचार मिळणे आवश्यक आहे. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी “सर्व प्रकारच्या हिंसाचाराचा निषेध करत आंतरराष्ट्रीय मानवतावादी कायद्यानुसार, नागरिकांच्या संरक्षणाच्या प्राथमिकतेची पुष्टी केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार, गेल्या दोन वर्षांत सुरक्षा दलांकडून 3,000 हून अधिक नागरिक मारले गेल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा

Back to top button