मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भोर घाटात भीषण अपघात; ३ ठार, ८ जखमी | पुढारी

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भोर घाटात भीषण अपघात; ३ ठार, ८ जखमी

प्रशांत गोपाळे

खोपोली : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर पहाटेच्या दरम्यान मोठा अपघात घडला. या अपघातात ट्रकचा ब्रेकफेल झाल्याने कोंबड्या घेऊन जाणारा ट्रक टेंपोवर आदळला. त्यांनतर टेंपोची धडक एका कारला बसल्याने आज (दि.१०) पहाटे मोठा अपघात घडून तीन जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींना  एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ वाहतूक थांबविण्यात आली होती. मात्र मदत कार्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.

भीषण अपघात; ३ ठार, ८ जखमी

माहितीनुसार,आज (दि.१०) पहाटे चारच्या सुमारास मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात झाला. चालक बालाजी वडर (वय 26) यांच्या ट्रकचा (ट्रक क्र. KA-56 – 3277) ब्रेक फेल झाल्याने त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर त्याने पुढे चालणाऱ्या टेम्पो (क्रमांक MH-03-CP- 2428) व ओमनी (क्र. MH -11- Y- 7832) या वाहनांना जोरात धडक दिली. या अपघातात ओमनी कारमध्ये चालकासह ५ व्यक्ती होते. त्यापैकी एका महिलेचा आणि एका पुरूषाचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी तर चालक किरकोळ जखमी झाला आहे. तर कोंबड्या वाहून नेणाऱ्या टेम्पोमधील चालकासह 4 जणांपैकी 2 गंभीर तर 2 जण किरकोळ जखमी झाले आहेत. ट्रकमध्ये चालकासह 3 जण होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर 2 जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी एम जी एम हाॅस्पिटल पनवेल आणि खोपोली नगरपालिका रुग्णालयात रवाना करण्यात आले आहे .

या अपघाताच्या ठिकाणी आयआरबीची देवदूत टीम, आयआरबी पेट्रोलिंग टीम, मृत्युंजय दूत, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, लोकमान्य हॉस्पिटल ॲम्बुलन्स सेवा, महाराष्ट्र शासनाची 108 ॲम्बुलन्स सेवा यांनी मदत केली. महामार्ग वाहतूक पोलीस- बोरघाटचे अधिकारी आणि कर्मचारी, खोपोली पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघात झाल्यानंतर काही वेळासाठी वाहतूक बाधित झाली होती. मात्र तात्काळ मदतकार्य पूर्ण करून वाहतूक खुली करण्यात आली.

हेही वाचा :

Back to top button