IPL 2023 Nicholas Pooran : निकोलस पूरनने ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पत्नी, नवजात मुलाला केला समर्पित | पुढारी

IPL 2023 Nicholas Pooran : निकोलस पूरनने 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्कार पत्नी, नवजात मुलाला केला समर्पित

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएल 2023 च्या 15 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूर विरुद्ध लखनौ सुपरजायंट्सच्या विकेटकीपर निकोलस पूरनने (IPL 2023 Nicholas Pooran) एम चिन्नास्वामी स्टेडियमवर तुफानी फलंदाजी करत धमाका केला. निकोलस पूरनने आरसीबीच्या गोलंदाजीची पिसे काढत अवघ्या 15 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 16 व्या मोसमात त्यांने सर्वात जलद अर्धशतक केले आहे. पूरनने 19 चेंडूत 62 धावांची खेळी खेळली, ज्यात त्याने 7 गगनाला भिडणारे षटकार आणि 4 उत्कृष्ट चौकार ठोकले.

दरम्यान, पत्नी आणि नवजात मुलाला ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार निकोलस पूरनने (IPL 2023 Nicholas Pooran) समर्पित करताना आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, मला ही कामगिरी माझ्या पत्नीला आणि नवजात मुलाना समर्पित करायची आहे. गेल्या काही काळापासून उत्कृष्ट खेळी करण्यासाठी मी स्वतःवर खूप दबाव टाकला होता. मला फक्त क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे, हसत मोकळेपणाने खेळायचे आहे, आणि मनोरंजन करायचे आहे. माझ्या संघासाठी सामना जिंकून द्यायचा आहे. मला आशा आहे की, हा हंगाम माझ्यासाठी चांगला जाईल.

IPL 2023 Nicholas Pooran : 16 व्या हंगामातील पूरनचे सर्वात वेगवान अर्धशतक

निकोलस पूरनने इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये केवळ 15 चेंडूत अर्धशतक पूर्ण करून एक मोठा विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम अजिंक्य रहाणेच्या नावावर होता. ज्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. तिसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचा शार्दुल ठाकूर आहे, ज्याने आरसीबीविरुद्ध २० चेंडूत अर्धशतक केले.

संबंधित बातम्या

त्याचबरोबर गुजरात टायटन्सच्या विजय शंकर आणि लखनौ सुपरजायंट्सच्या काइल मेयर्स यांनीही २१-२१ चेंडूंमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. इतकेच नाही तर पूरन हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात वेगवान अर्धशतक करणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी केकेआरकडून पॅट कमिन्सने 14 चेंडूत 50 धावा करण्याचा पराक्रम केला आहे.

हेही वाचा 

Back to top button