मरणयातना..! तुर्कीत भूकंपग्रस्तांची उपासमार, निवाऱ्यासाठी शोधाशोध

मरणयातना..!  तुर्कीत भूकंपग्रस्तांची उपासमार, निवाऱ्यासाठी शोधाशोध
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन: महाभयंकर भूकंपाने तुर्कीसह सीरियात मृत्यूचा आकडा वाढतच आहे. शक्तीशाली भूकंपानंतर तुर्की आणि सीरियात २१ हजारांहून अधिक जणांचा बळी गेला. आत्तापर्यंत हजारो लोकांना वाचवण्यात यश आले आहे.  हजारो लोक जखमी झालेत. शेकडो नागरिकबेघर झाले. अनेकांची उपासमार सुरू आहे. त्यातच येथे प्रचंड बर्फवृष्टी होत असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. निसर्गाच्‍या प्रकोपाचा  सामना करणार्‍या नागरिकांना आता कडाक्‍याच्‍या थंडीचा सामना करावा लागत आहे. भूकंपातून बचावलेल्‍या हजारो नागरिकांना मरणयातना भोगाव्‍या लागत आहेत.

निवारा हरवला आणि भूकसह थंडीशी सामना;  उद्‍ध्‍वस्‍त इमारत्‍यांचे अवशेषांचा आसरा

भूकंपग्रस्त भागत बचावकार्य वेगाने सुरू आहे. जखमींना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्यावर उपचार करण्‍यासाठी शर्थीचे प्रयत्‍न सुरु आहेत. भूकंपाचा सर्वाधिक फटका बसलेल्‍या  'हाताय'  प्रांतातील नागरिकांचे घरे पूर्णपणे उद्‍ध्‍वस्‍त उद्धवस्थ झाली आहेत. येथील लोक थंडी, भूक आणि निराशेशी झुंज देत आहेत. पुरेसे तंबू आणि निवारा नसल्याने भूकंपातून वाचलेले लोक शून्य अंश डिग्री तापमानात रस्त्यावरच राहात आहेत. काहीजण उद्‍ध्‍वस्‍त उद्ध्वस्थ घरे, सुपरमार्केट, कारपार्क, मशिदी, रस्त्याच्या कडेला कोसळलेल्‍या इमारतींच्‍या अवशेषांखालीच आसरा घेत आहेत.

विमान धावपट्टी-रेल्वेरूळ उद्‍ध्‍वस्‍त

शक्‍तीशाली भूकंपात तुर्कीतील विमानतळच्या धावपट्टी आणि रेल्वेरूळ उद्‍ध्‍वस्‍त झाले आहेत. त्‍यामुळे भूकंपग्रस्तांपर्यंत मदत पोहचणे कठीण होत आहे. सर्वाधिक मदतीची गरज असलेल्या हाताय शहरात स्वयंसेवकांकडून चालत जावूनच भूकंपग्रस्‍तांना मदत पोहचवली जात आहे. बचावकार्यात सहभागी असेल्या स्वयंसेवकांकडून या प्रदेशातील रस्त्यावरूनच चालत जाऊन मदत पोहचवली जात आहे.

भारताकडून 'ऑपरेशन दोस्त'; काही तासात वैद्यकीय मदत

हाताय  शहरात भारतीय सैन्याकडून 60 पॅराफिल्ड सेटअप उभारण्यात आले आहेत. यामध्ये 30 खाटांचे हॉस्पिटल उभारले आहे. 'ऑपरेशन दोस्त' अंतर्गत भूकंपातून वाचलेल्या जखमींना काही तासात या ठिकाणी दाखल केले जाते. त्यानंतर काही तासांतच जखमींना वैद्यकीय उपचार आणि मदत देण्यात येते. भारताच्या या वैद्यकीय पथकात १४ डॉक्टर आणि ८६ पॅरामेडिक्सचा समावेश आहे. भारताने उभारलेल्या वैद्यकीय तंबुत अनेक रूग्ण उपचार घेत असल्याचे मेजर डॉ. बीना तिवारी यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना सांगितले.

 जगभरातून मदतीचा हात

तुर्कीच्या आपत्ती-व्यवस्थापन एजन्सीने सांगितले की, 110,000 हून अधिक बचाव कर्मचारी आता मदत कार्यात सहभागी झाले आहेत. ट्रॅक्टर, क्रेन, बुलडोझर आणि उत्खनन यंत्रांसह 5,500 हून अधिक वाहने इतर देशातून पाठवण्यात आली आहेत. आत्तापर्यंत जगभरातील ९५ देशांनी मदत केल्याचे येथीन परराष्ट्र मंत्रालयाने म्‍हटले आहे.

जागतिक बँकेकडून 1.78 अब्ज डॉलरची मदत

शक्तीशाली भूकंपानंतर विविध समस्यांशी झुंज देणाऱ्या तुर्कीला जागतिक बँकेकडून मोठे अर्थसहाय्य करण्यात आले आहे. यामध्ये बँकेने तुर्कीसह भूकंपात नुकसान झालेल्या देशांना 1.78 अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे. जागतिक बँकेने एका निवेदनात म्हटले आहे की, तुर्कीतील अंकारा शहरासाठी 780 दशलक्ष इतकी रक्कम तात्काळ उपलब्ध होईल. तुर्कीच्या पुनर्बांधणीसाठी आणखी १ अब्ज डॉलरची मदत देखील तयार केली जात आहे. परंतु ही व्यवस्था करण्यासाठी आणखी वेळ लागेल, असेही जागतिक बँकेने स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news