Koyna Seismological Station : कोयना भूकंपमापन केंद्रातही तुर्कीतील भूकंपाच्या नोंदी | पुढारी

Koyna Seismological Station : कोयना भूकंपमापन केंद्रातही तुर्कीतील भूकंपाच्या नोंदी

पाटण : पुढारी वृत्तसेवा : तुर्की येथे सोमवारी (दि. ६) ७.८ व ६.७ रिश्टर स्केलचे दोन प्रलयंकारी भूकंप झाले. कोयना जालव्यूहातील सातारा, कोल्हापूर आणि कोयनानगर येथील भूकंप वेधशाळेमध्ये या भूकंपाच्या नोंदी झाल्या आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार हे भूकंप सकाळी ६.५५ वाजता व १०.३२ वाजता अनुक्रमे ७.८ व ६.७ रिश्टर स्केल नोंदविले गेले आहेत.

एवढ्या लांबच्या अंतरावरील भूकंपाच्या नोंदी कोयना भूकंपमापन केंद्रावर स्पष्ट आणि अचूकपणे नोंदविल्याने निश्चितच कोयना प्रकल्पातील तांत्रिकता, आधुनिकता व व्यवस्थापन याबाबत सार्वत्रिक कौतुक होत आहे.

४,५०० किलोमीटर अंतरावरील या भूकंपाच्या नोंदी कोयना जालव्यूहातील भूकंप वेधशाळेमध्ये झाल्यामुळे भूकंपमापन यंत्राची कार्यपद्धती व कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. त्यामुळे कार्यकारी अभियंता नितेश पोतदार यांनी भूकंप वेधशाळेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.

Back to top button