Earthquake in Turkey : तुर्कीमध्ये भूकंपानंतर २८ हजार जणांचे प्राण वाचले | पुढारी

Earthquake in Turkey : तुर्कीमध्ये भूकंपानंतर २८ हजार जणांचे प्राण वाचले

पुढारी ऑनलाईन : शक्तीशाली भूकंपाने तुर्कस्तानमध्ये हाहाकार माजला आहे. आत्तापर्यंत १६ हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.  जून ६४ हजारांहून अधिक लोक जखमी असल्याचे येथील प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.  दरम्यान, दक्षिण तुर्कीतील भूकंपग्रस्त भागातून आत्तापर्यंत २८ हजारांहून अधिक लोकांचे प्राण वाचवण्यात  यंत्रणेला यश आले आहे. उपचारासाठी त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, असे तुर्कस्तानमधील आपत्ती व्यवस्थापनाने म्हटले असल्याची माहिती ‘अनाडुलू’ या स्थानिक वृत्तसंस्थेने (ANADOLU AGENCY) दिली आहे.

बचावकार्य अधिक वेगाने सुरू असून, मृतांचा आकडा आणखी मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता बचाव यंत्रणेकडून व्यक्त केली जात आहे. शक्तीशाली भूकंपानंतर हे लोक जरी वाचले असले, तरी त्याच्या जीवाचा धोका अद्याप टळलेला नाही. या जीवघेण्या संकंटानंतरही त्यांना निवारा, वस्त्र,पाणी, इंधन, वीज यांसारख्या जीवनावश्यक गोष्टी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. त्यामुळे वाचलेल्या अनेकांचे प्राण जावू शकतात,अशी भीती जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे.

हेही वाचा :

Back to top button