डेटिंग साईटवर हवा ‘तो’ मिळाला नाही पण भेटले ११ लाख! | पुढारी

डेटिंग साईटवर हवा 'तो' मिळाला नाही पण भेटले ११ लाख!

लंडन : पुढारी ऑनलाईन 

जगभरात सध्या ऑनलाईन डेटिंगचा ट्रेंड सुरु आहे. प्रत्येकाच्या आवडी निवडीनुसार, गरजेनुसार भरपूर डेटिंग साईट उपलब्ध आहेत. सगळ्याच डेटिंग साईट आपल्याकडे सर्वोत्तम प्रोफाईल असल्याचा दावा करत असतात. पण, असाच दावा करणे एका प्रतिष्ठित डेटिंग साईटला चांगलेच भोवले. 

सेंट्रल लंडन नाईट्सब्रिज येथे स्थित असलेल्या एका एलिट डेटिंग साईटवर तेरेझा बुरकी या ४७ वर्षीय महिलेने दावा ठोकला. तिच्या म्हणण्यानुसार या डेटिंग वेबसाईटने चुकीची माहिती दिली. तसेच त्यांनी फसवणूक केली. या वेबसाईट आपल्याकडे भरपूर एलिट पुरुषांच्या प्रोफाईल आहेत, असा दावा केला पण प्रत्यक्षात अशा प्रोफाईलची त्यांच्याकडे कमतरता होती. 

तेरेझांच्या या दाव्यावर उच्च न्यायालयाने त्यांच्या बाजूने निकाल देत डेटिंग एजन्सीला जवळपास ११ लाख रुपये परत देण्याचा आदेश दिला. न्यायाधिश निकाल देताना म्हणाले की, ‘या केसमध्ये महिला रोमँटिक हॅप्पीनेसच्या शोधात होती. तिला या डेटिंग एजन्सीने मोठ्या रकमेच्या मोबदल्यात याची हमी दिली. पण, ती एजन्सी चांगली सेवा देण्यात अपयशी ठरली.’

दरम्यान, तीन मुलांची आई असलेली ४७ वर्षीय महिला एका उच्चभ्रु पुरुषाच्या शोधात होती. पण तिने केलेल्या दाव्यात या डेटिंग साईटने तिला फक्त १०० पुरुषांच्या प्रोफाईल दाखवल्या. तर कंपनीच्या म्हणण्यानुसार ते एलिट डेटिंग साईट चालवतात येथे अशा लोकांची संख्या कमीच असते. कारण मुळातच सिंगल, श्रीमंत, उज्वल भविष्य असणार्ऱ्या पुरुषांची संख्या हजारात नसते.

Back to top button