Nijjar Murder Case : हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी तीन भारतीयांना अटक; कॅनडा पोलिसांनी दावा

File Photo
File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : शीख फुटीरतावादी नेता हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याच्या हत्येच्या आरोपाखाली तीन भारतीय नागरिकांना अटक करण्यात आली आहे. निज्जर याच्या हत्तेनंतर भारत आणि कॅनडा यांच्यात नवीन मोठा राजनैतिक वाद निर्माण झाला होता.

गेल्या वर्षी जूनमध्ये कॅनडाच्या व्हँकुव्हरजवळ बंदुकधारींनी ४५ वर्षीय हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यावेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी या हत्येत भारताचा हात असल्याचा आरोप केला होता आणि याबाबत त्यांच्याकडे विश्वसनीय पुरावे असल्याचे म्हटले होते. मात्र, भारताने हे आरोप फेटाळून लावले होते. आता हरदीपसिंग याच्या हत्येप्रकरणी तीन भारतीयांना अटक करण्यात आल्याचा दावा कॅनडाच्या पोलिसांनी केला आहे.

अनेक महिन्यांपासून पोलिसांची त्यांच्यावर नजर होती. निज्जरच्या हत्येचे काम भारताने त्यांच्यावर सोपवले होते, असा पोलिसांचा समज आहे. करण ब्रार, करणप्रीत सिंग आणि कमलप्रीत सिंग अशी आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले. तिघांचेही वय २० ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे. अल्बर्टा आणि ओंटारियो या दोन प्रांतांमध्ये केलेल्या कारवाईत तिघांना अटक करण्यात आल्याचे कॅनडाच्या माध्यमांनी म्हटले आहे.

हत्येतील तिन्ही आरोपींच्या भूमिका वेगवेगळ्या

कॅनडाच्या पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, निज्जरच्या हत्येमध्ये तिन्ही आरोपींनी वेगवेगळ्या भूमिका बजावल्या. त्यातील एकाव निज्जरचे ठिकाण शोधण्याची जबाबदारी होती. दुसरा आरोपी ड्रायव्हर होता आणि तिसऱ्याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपीच्या अटकेनंतर कॅनडाचे सार्वजनिक सुरक्षा मंत्री डॉमिनिक लेब्लँक यांना निज्जर हत्याकांडप्रकरणी प्रश्न विचारण्यात आला. यात भारताचा सहभाग असण्याची शक्यता त्यांनी नाकारलेली नाही. लेब्लँक म्हणाले, मला कॅनडाच्या सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी निज्जर खून प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. त्याचा भारताशी संबंध आहे की नाही, याचे उत्तर पोलिसच देऊ शकतील.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news