चीनमध्ये हॉटेलला आग; १९ जण मृत्युमुखी | पुढारी

चीनमध्ये हॉटेलला आग; १९ जण मृत्युमुखी

बिजींग : पुढारी ऑनलाईन

चीनमधील टुरिस्ट शहर असणाऱ्या हार्बिनमध्ये एका हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत १९ जणांचा होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. आगीमध्ये २३ जण जखमी झाले आहेत. सोंगबेई जिल्ह्यातील बेलाँग हॉट स्प्रिंग ल्येसुर हे हॉटेल आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. जवळपास १०० अग्नीशमन दलाचे जवान आणि ३० गाड्यांनी आग नियंत्रणात आणण्यात आली.  

दरम्यान ८० लोकांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले. या आगीमध्ये १८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर एकाचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. मृत पडलेल्या लोकांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान हॉटेलमध्ये लागलेल्या आगीची चौकशी करण्यात येत आहे. 

 

Back to top button