व्हिएतनाम युद्धातील हिरो जॉन मॅक्केन कालवश | पुढारी

व्हिएतनाम युद्धातील हिरो जॉन मॅक्केन कालवश

वॉशिंग्टन : वृत्तसेवा 

व्हिएतनामध्ये युद्धामध्ये अमेरिकेचे हिरो मानले गेलेले आणि अमेरिकेचे विद्यमान सिनेटर जॉन मॅक्केन यांचे निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गत काही दिवसांपासून ते कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त असल्याचे सांगण्यात आले आहे.

मॅक्केन यांच्या निधनावर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी शोक व्यक्‍त केला आहे. व्हिएतनामध्ये चाललेल्या दीर्घ कालीन युद्धात मॅक्केन यांनी अमेरिकेच्या बाजूने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या युद्धतंत्रामुळेच त्यांना अमेरिकेत हिरो मानले गेले होते.

 

Back to top button