विधवांसाठी गृह आधार, डीडीएसएस एकत्र : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत | पुढारी

विधवांसाठी गृह आधार, डीडीएसएस एकत्र : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  विधवा महिलेचे सर्वात लहान मूल 18 वर्षांच्या खालील असेल, तर तिला गृह आधार व दीनदयाळ स्वास्थ्य सेवा (डीडीएसएस) योजना एकत्रित करून देण्याबाबत समाज कल्याण खात्याने प्रस्ताव पाठवला आहे. यावर अर्थ खात्याला प्रस्ताव पाठवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मंगळवारी विधानसभेचे आमदार गणेश गावकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितले, या दोन्ही योजना एकत्रित करून देण्यासाठी अर्थ खात्याकडे प्रस्ताव आला आहे. मात्र खात्याने यामध्ये काही त्रुटी काढल्या आहेत. राज्यात अशा सुमारे 4 हजार विधवा असतील. त्यांना गृह आधारचे 1500 तर डीडीएसएसचे 2500 दिले तर अर्थ खात्यावर अतिरिक्त बोजा पडणार आहे. असे असले तरी मी अर्थ खात्याला प्रस्तावावर विचार करून सकारात्मक तोडगा काढण्यास सांगितले आहे.

Back to top button