Karnataka SSLC Results : कर्नाटकात दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी, बागलकोटची अंकिता प्रथम | पुढारी

Karnataka SSLC Results : कर्नाटकात दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींचीच बाजी, बागलकोटची अंकिता प्रथम

बेंगळूर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटक शालेय परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाने २०२३-२४ वर्षाच्या दहावी परीक्षा-१ चा निकाल (Karnataka SSLC Results) आज (दि.९) जाहीर केला. यावर्षी ७३.४० टक्के निकाल लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.

कर्नाटक बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी साडेदहा वाजता बंगळूर येथील मल्लेश्वरम कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन निकाल (Karnataka SSLC Results) जाहीर केला. मेल्लिगेरी मोरारजी रेसिडेन्शिअल स्कूल, बागलकोटची विद्यार्थिनी अंकिता बसप्पा ही राज्यात ६२५ पैकी ६२५ गुण मिळवून प्रथम आली आहे. गतवर्षीपेक्षा दहावीच्या निकालात दहा टक्क्यांची घट झाली आहे. गेल्यावर्षी ८३.८९ टक्के निकाल लागला होता.

हेही वाचा : 

Back to top button