केजरीवालांच्या अडचणी वाढणार, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’ उद्या दाखल करणार आरोपपत्र | पुढारी

केजरीवालांच्या अडचणी वाढणार, दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी 'ईडी' उद्या दाखल करणार आरोपपत्र

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) उद्या (दि. १०) आरोपपत्र दाखल करणार आहे. केजरीवाल यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ईडी आपल्या आरोपपत्रात मुख्य सूत्रधार आणि किंगपिन म्हणून केजरीवाल यांच्या नावाची यादी करणार आहे.

दिल्ली दारू घोटाळ्यात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) उद्या दिल्लीच्यामुख्यमंत्र्यांविरोधात आरोपपत्र दाखल करणार आहे. केजरीवाल यांच्या नावाचा आरोपपत्रात समावेश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

आरोपपत्रात मुख्य सूत्रधार म्‍हणून नावाचा  समावेश

ईडी आपल्या आरोपपत्रात मुख्य सूत्रधार म्हणून केजरीवाल यांच्या नावाचा उल्‍लेख रणार आहे. अंमलबजावणी संचालनालयाचा दावा आहे की, अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंधित मनी ट्रेल शोधून काढले आहे. उद्या सुप्रीम कोर्टात केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनावरही सुनावणी होणार आहे.

केजरीवाल २१ मार्चपासून तुरुंगात आहेत

दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने 21 मार्च रोजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली होती. यापूर्वी ईडीने त्यांना या प्रकरणात चौकशीसाठी 9 समन्स बजावले होते. मात्र, केजरीवाल कोणत्याही समन्सवर हजर झाले नाहीत. तो या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार होता आणि दारूच्या व्यापाऱ्यांकडून लाच मागण्यात त्याचा थेट सहभाग होता, असा केंद्रीय तपास यंत्रणेचा आरोप आहे. हे आरोप फेटाळून लावणाऱ्या ‘आप’ने दिल्लीत नेतृत्व बदल होणार नसून मुख्यमंत्री केजरीवाल तुरुंगातूनच सरकार चालवतील, असे स्‍पष्‍ट केले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button