Goa Assembly Session : कला अकादमीच्या विषयावर विधानसभेत विरोधकांचा गदारोळ | पुढारी

Goa Assembly Session : कला अकादमीच्या विषयावर विधानसभेत विरोधकांचा गदारोळ

पणजी: पुढारी वृत्तसेवा : आज गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन (Goa Assembly Session) सुरू झाले. दोन दिवसापूर्वी कला अकादमीच्या खुल्या सभागृहाच्या रंगमंचाचे स्लॅब कोसळले होते. त्यावरून विरोधकांनी आज मंगळवारी (दि.१८) रोजी सुरुवातीलाच गदारोळ केला.

भ्रष्टाचाराची चौकशी करा, कला अकादमीच्या कोसळल्याच्या प्रकाराची चौकशी करा. अशा मागण्याचे फलक घेऊन गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई हे सुरुवातीला सभापतीच्या समोर गेले. त्यानंतर काँग्रेसचे तीन आमदार, आपचे दोन आमदार व आरजी पक्षाचा एक असे सातही विरोधी आमदार सभापती समोर गेले. सुरुवातीलाच कला अकादमीच्या संदर्भात चर्चा करण्याची मागणी केली. मात्र, सभापती रमेश तवडकर यांनी प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर चर्चा करू, असे आश्वासन दिले. मात्र, विरोधक ऐकण्याच्या स्थितीत नव्हते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही प्रश्नोत्तराच्या तासानंतर आपण या विषयावर प्रतिक्रिया देतो. असे सांगितले. मात्र, विरोधक ऐकण्याच्या स्थितीत नसल्यामुळे शेवटी सभापतींनी काही वेळासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. पावसाळी अधिवेशनाची सुरूवातच आज कला अकादमीच्या विषयावरून झाली असून यापुढेही विधानसभेमध्ये हा विषय बराच गाजण्याची शक्यता आहे. (Goa Assembly Session)

हेही वाचा : 

 

 

Back to top button