पुढारी ऑनलाईन : भारतविरोधी पक्षांची आज बंगळूरात बैठक होत असतानाच दुसरीकडे भाजपप्रणीत एनडीएची आज दिल्लीत बैठक होत आहे. यामध्ये भाजपचे ३८ मित्रपक्ष सहभागी होणार आहेत, मात्र या बैठकीला राष्ट्रीय समाज पक्षाला आमंत्रित करण्यात आलेले नाही. याविषयी राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर माध्यमांशी संवाद साधाला तेव्हा 'मी कुणाकडे भीक मागणार नाही, माझी सुखाची झोपडी मीच बांधणार' असे मत जानकर (Mahadev Jankar) यांनी व्यक्त केले आहे.
दिल्लीत आज भाजपप्रणीत एनडीएची बैठक होणार आहे. या बैठकीला महादेव जानकर यांना आमंत्रित करण्यात आलेले नाही, यावर बोलताना जानकर म्हणाले, 'मी बैठकीला बोलवा असे सांगणार नाही. आम्ही स्वाभिमानी आहोत, नाराज कशाला होऊ? आम्ही स्वत:ची आघाडी तयार करू' असे देखील जानकर (Mahadev Jankar) यांनी म्हटले आहे.
या बैठकीला महाराष्ट्रातील शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल पटेल बैठकीला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती देखील समोर (Mahadev Jankar) आली आहे.