गोवा : १ लाख ८० हजार किंमतीच्या अमली पदार्थासह तरूणाला अटक | पुढारी

गोवा : १ लाख ८० हजार किंमतीच्या अमली पदार्थासह तरूणाला अटक

पणजी; पुढारी व्रुतसेवा : हणजून पोलिसांनी १ लाख ८० हजार रुपये किंमतीच्या अमली पदार्थासह पश्‍चिम बंगालच्या रहिवाश्याला अटक केली. हणजून पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशाल देसाई आणि महिला पोलिस उपनिरीक्षक स्नेहा सावळ यांच्या पथकाने आज (दि.१०) चॅपल बागा खाडी, बागा, बार्देध गोवा येथे छापा टाकला. यामध्ये आरोपी सुकुमार कुमार (वय- २७ वर्षे, रा. मोरजि पेडणे मुळ मोहिपूर, पश्चिम बंगाल) याला अटक केली. त्याच्याकडे १,८०,००० किंमतीचे १,७३४ ग्रॅम अमली पदार्थ सापडले.

म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी यांनी याबाबत माहिती दिली. आरोपी व्यक्तीला एनडीपीएस कायद्यानुसार अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक (उत्तर गोवा) निधीन वालसन यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

हेही वाचा;

Back to top button