French Open : स्वायटेकने रचला इतिहास, तिसऱ्यांदा जिंकले फ्रेंच ओपन | पुढारी

French Open : स्वायटेकने रचला इतिहास, तिसऱ्यांदा जिंकले फ्रेंच ओपन

पुढारी ऑनलाईन डेस्क : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली महिला टेनिसपटू पोलंडची इगा स्वायटेक हिने फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले आहे. तिने हे ग्रँडस्लॅम तिसऱ्यांदा जिंकले आहे. स्वायटेकने अंतिम फेरीत कॅरोलिना मुचोव्हा हिचा तीन सेटच्या चुरशीच्या लढतीत पराभव केला. स्विटेकने अंतिम सामना 6-2, 5-7, 6-4 असा जिंकला. (French Open)

स्वायटेकने या सामन्यात दमदार सुरुवात केली. तिने पहिला सेट 6-2 असा सहज जिंकला. मुचोवाने दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत ती अंतिम फेरीत का पोहोचली हे दाखवून दिले. बिगरमानांकित असूनही त्याने नंबर-1 खेळाडूसमोर हार मानली नाही आणि दुसरा सेट 7-5 असा जिंकला. यानंतर सामना निर्णायक सेटपर्यंत पोहोचला. यातही मुचोवाने एका क्षणी आघाडी राखली, पण तिला अंतिम फेरीचे दडपण सांभाळता आले नाही. स्विटेकने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत हा सेट 6-4 असा जिंकला. (French Open)

स्वायटेकचे चौथे ग्रँडस्लॅम (French Open)

स्वायटेकने तिसऱ्यांदा फ्रेंच ओपनचे विजेतेपद पटकावले. 2020 आणि 2022 मध्येही ती येथे जिंकण्यात यशस्वी ठरली होती. याशिवाय गेल्या वर्षी स्विटेकने यूएस ओपन जिंकली होती. आता तिची नजर जुलैमध्ये प्रथमच विम्बल्डन ओपन जिंकण्यावर असेल. (French Open)

हेही वाचलंत का?

Back to top button