दिल्लीतील फटाके आणि सामनामधील पेढ्यांचा काय संबंध : नितेश राणे | पुढारी

दिल्लीतील फटाके आणि सामनामधील पेढ्यांचा काय संबंध : नितेश राणे

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दिल्लीमधल्या फटाक्याचा आणि सामनामध्ये पेढ्यांचा काय संबंध आहे? शकूनी मामाने आपलं काम महाविकास आघाडीमध्ये पूर्ण केलंय का? असा सवाल भाजप नेते आ. नितेश राणे यांनी उपस्थित केला. अमरावती दौरा आटोपून जाताना ते माध्यमांशी बोलत होते.

विरोधी पक्षनेते अजित पवारांबद्दल संजय राऊत जे वक्तव्य करत होते त्याचा आणि राष्ट्रवादीच्या आजच्या घडामोडी, निर्णयाचे काही कनेक्शन आहे का ते बघावं लागेल असेही ते म्हणाले. आजच्या निमित्ताने मला पार्थची चिंता वाटते, त्याला खरेतर मोठं पद मिळायला पाहिजे होतं असा टोला लगावला.

दरम्यान, अमरावतीत माझा ताफा अडवलेली शिवसेना म्हणजे शिल्लक सेना आहे. संजय राऊतांनी आपल्या मालकाची जी अवस्था केली आहे. त्यावर सामनामध्ये अग्रलेख होऊन जाऊ दे. भारतीय जनता पक्ष आणि एनडीएसाठी अमरावतीत पोषक वातावरण आहे चिंतेचे कारण नसल्याचे आ. राणे म्हणाले.

हेही वाचा;

Back to top button