गोवा : झुआरी पुलावर हजारोंची गर्दी; उद्यापर्यंत राहणार खुला | पुढारी

गोवा : झुआरी पुलावर हजारोंची गर्दी; उद्यापर्यंत राहणार खुला

पणजी : पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नव्या झुआरी पुलावर लोकांना सहल करण्यास परवानगी दिली. त्यामुळे गेल्या तीन दिवसांत या पुलाला हजारो नागरिकांनी सहकुटुंब भेट दिली. त्यामुळे नवे झुआरी पूल लोकांच्या गर्दीने गजबजून गेले आहे.

झुआरी नव्या पुलाचे उद्घाटन गुरुवार, २९ रोजी होणार असून गोव्यातील नागरिकांना हे अत्याधुनिक केबल स्टेड पूल पाहता यावे आणि या पुलावर सहलीचा आनंद घेता यावा, यासाठी २८ तारखेपर्यंत हे पूल लोकांसाठी खुले केलेले आहे. या संधीचा लाभ गोवा भरातील हजारो नागरिकासह पर्यटकही घेताना दिसत दि. २५ ते २८ असे चार दिवस संध्याकाळी ५ ते रात्री ८ वा. या वेळेमध्ये हा पूल लोकांसाठी खुला आहे. झुआरी नदीवर बराच उंचीवर अत्याधुनिक पद्धतीने बांधलेला हा केबल स्टेड पूल पाहण्यासाठी सहकुटुंब नागरिक या पुलावर येत आहेत.

शाळांना सध्या ख्रिसमसची सुट्टी असल्यामुळे लहान मुले आपल्या पालकांसह या पुलावर सहलीचा आनंद घेत आहेत. तरुण तरुणीही पुलावर सेल्फी काढताना दिसतात. संध्याकाळी सहाच्या सुमारास या पुलावर तुडुंब गर्दी होते. आपली वाहने एका बाजूला ठेवून सर्व नागरिक लहान मुलासह पायी चालत या पुलावर जाऊन मनमोहक अशा या पुलाचा, परिसराचा आनंद घेत आहेत. परिसरातील निसर्गसौंदर्याचे आणि झुआरी नदीच्या पात्राचे विहंगम सौंदर्याचा आस्वाद घेत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button