नाशिक : शहरात नायलॉन मांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर | पुढारी

नाशिक : शहरात नायलॉन मांजा विक्रेते पोलिसांच्या रडारवर

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नायलॉन मांजा विक्री, वापरावर बंदी असतानाही त्याची विक्री होत असल्याचे समोर आले आहे. भद्रकाली पोलिसांनी एका विक्रेत्यास अटक केली असून त्याच्याकडून सुमारे हजारो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. गत दाेन दिवसांत ही तिसरी कारवाई असून पोलिसांनी या कारवायांमध्ये दीड लाख रुपयांचा मांजाचा साठा जप्त केला आहे.

भद्रकाली पोलिसांनी रमेश साळवे (३०, रा. कुंभारवाडा, जुने नाशिक) या संशयितास पकडले आहे. पाेलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नायलॉन मांजा वापरास बंदी असल्याचा मनाई आदेश काढला आहे. परिमंडळ एकचे उपायुक्त किरण चव्हाण, सरकारवाडा विभागाच्या सहायक आयुक्त दीपाली खन्ना यांनी नायलॉन मांजा वापरणारे व विक्री करणाऱ्यांवर कारवाईच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार भद्रकालीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ता पवार, यांच्या सूचनेनुसार पथक शाेध घेत असताना सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पाेलिस नाईक रमेश कोळी, लक्ष्मण ठेपणे, धनंजय हासे यांनी सायंकाळी पाच वाजता कुंभारवाडा येथील मोकळ्या जागेतून संशयितास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने २७ हजार ५०० रुपयांचा नायलॉन मांजाचे ५० गट्टू पाेलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी भद्रकाली पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button