नागपूर : पुढारी ऑनलाईन : 'सीमाप्रश्नी बोटचेपी भूमिका कशासाठी घेताय' असा सवाल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. ते नागपुरात बोलत होते. संजय राऊत म्हणाले की, नागपुरात विधान भवनाच्या पायऱ्यावर टाळ वाजवून माविआकडून आदोलंन केले जात आहे, कोणी भूखंड द्या कोणी गायरान द्या अशा अवस्था झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रामुख्याने आदित्य ठाकरेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.
देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना राऊत म्हणाले, देंवेद्रजी तुम्ही ऐवडे कसे बदललात?, संसदेत विरोधकाला बोलूच दिले जात नाही, भ्रष्टाचारी सरकारचं ओझ देवेंद्र फडणवीस जास्त काळ पेलू शकणार नाहीत. शिदे, सत्ता. राठोडवरचा आरोप हा लंवगी फटाका नाही. मला देवेंद्र फडणवीसांबद्दल सहानुभूती आहे. एटीआयटीचे १६ भूंखड लाटले गेले असून संपूर्ण सरकार अडचणीत आहे. भूंखडामध्ये कोट्यवधी रूपयांचा व्यवहार झाला आहे. सीमाभाग केंद्रशासित करून घ्यावा. असेही त्यांनी नमूद केले.
हेही वाचलंत का?