गोवा : पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकास दंडाचे अधिकार | पुढारी

गोवा : पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकास दंडाचे अधिकार

पणजी; पुढारी वृत्तसेवा :  पोलिस खात्याने बुधवारी काढलेल्या परिपत्रकानुसार जे वाहनचालक वाहतूक नियमांचा भंग करतात, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार पोलिस खात्यातील सहायक पोलिस उपनिरीक्षक (एएसआय), पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय), पोलिस निरीक्षक (पीआय) व त्यांच्यावरील पोलिस अधिकार्‍यांना आहे.

पोलिस शिपाई (काँस्टेबल) किंवा हवालदार (हेड काँस्टेबल) यांनी वाहन चालकांना दंड आकारू नये. एखादा वाहनचालक वाहतूक कायद्याचा भंग करीत असेल तरच ज्यांना अधिकार आहेत, त्यांनी त्या वाहनचालकाला अडवून दंड करावा. वाहनचालकांना अडवून नाहक त्यांना त्रास देऊ नये, असेही या परिपत्रकात म्हले आहे.

यापूर्वी काढलेल्या परिपत्रकात फक्‍त पोलिस निरीक्षकांना व त्यावरील अधिकार्‍यांना दंड करण्याचे अधिकार दिले होते. मात्र, पोलिस निरीक्षक रस्त्यावर राहिले तर पोलिस ठाण्यात कारभार विस्कळीत होईल. त्यामुळे आता सहायक पोलिस उपनिरीक्षक व त्यावरील पोलिस अधिकार्‍यांना दंड करण्याचे अधिकार दिले आहेत. पोलिस खात्याच्या या परिपत्रकामुळे पोलिस शिपाई व होम गार्डकडून वाहन चालकांना होणारा नाहक त्रास थांबेल, अशी अपेक्षा आहे.

Back to top button