Goa Election : मोतीडोंगर मतदारसंघाचे उमेदवार समोरासमोर आल्याने काही काळ तणाव | पुढारी

Goa Election : मोतीडोंगर मतदारसंघाचे उमेदवार समोरासमोर आल्याने काही काळ तणाव

मडगाव ः पुढारी वृत्तसेवा ः भाजपचे उमेदवार बाबू आजगावकर आणि आमदार दिगंबर कामत मोतीडोंगर येथे समोरासमोर आले.  यामुळे येथे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. मडगावच्या मोतीडोंगरावर आपले वर्चस्व गाजवण्यासाठी बाबू आजगावकर प्रयत्नशील आहेत. भाजपचे उमेदवार बाबू आजगावकर आणि गेली अनेक वर्षे या मतदारसंघाचे आमदार आहेत. कामत पन्नास मतदारांना घेऊन मतदान केंद्रात गेल्याच्या आरोप  आजगावकर यांनी  केला. दिगंबर कामत यांचा त्यांनी पाठलाग  केल्यामुळे कामतांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या नावाने घोषणा दिल्या. या घटनेनंतर मोतीडोंगर येथे पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती.

 मोती डोंगरावरील मतदान केंद्र संवेदनशील म्हणून ओळखले जाते. मतदानादरम्यान याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने याठिकाणी पोलिस सुरक्षा ठेवण्यात आली होती. आमदार दिगंबर कामत आपल्या समर्थकांसह मोती डोंगरावर तळ ठोकुन होते. दिगंबर कामत बाहेरच्या पन्नास जणांना घेऊन गिरीजन हिंदी शाळेतील मतदानकेंद्रात गेले होते. याची माहिती मिळताच बाबू आजगावकर यांनीही आपल्या समर्थकांसह मोती डोंगर गाठला. मोतीडोंगरावर येताच बाबू अजगावकर यांनी पोलीस अधिकाऱ्यांना धारेवर धरले. जमावाला घेऊन दिगंबर कामत यांना मतदानकेंद्रात सोडलेच कसे? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचलतं का?

Back to top button