जळगाव : राज्य उत्पादक शुल्काच्या धाडीत 2 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, 19 गुन्ह्यांची नोंद | पुढारी

जळगाव : राज्य उत्पादक शुल्काच्या धाडीत 2 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त, 19 गुन्ह्यांची नोंद

जळगाव : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात राज्य उत्पादक शुल्क खात्याच्या दोन भरारी पथकांनी चार धाडी टाकत अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या विरोधात १९ गुन्ह्यांची नोंद केली. या कारवाईत १० आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवित २ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

राज्य उत्पादक संघ खात्याचे अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक आणि जळगावचे पथक या कारवाईत शामिल होते. या पथकांनी गिरड ता. पाचोरा, टोणगांव ता. भडगांव, तामसवाडी ता. पारोळा खाचणे ता. चोपडा येथील अवैध हातभटटी निर्मीती केंद्र तसेच मालेगांव तालुक्‍यातील हायवे च्या बाजुने असलेले ढाबे येथे कारवाई करुन एकुण १९ गुन्हे नोंद केले.  त्यात ४२९० लिटर कच्चे रसायन, मुददेमाल जप्त करण्यात आला.

या कारवाईत निरीक्षक अरुण चव्हाण, किरण पाटील, चंद्रकांत पाटील, सुजित कपाटे, दुय्यम निरीक्षक विकास पाटील, माधव तेलंगे, रिंकेष दांगट, विलास पाटील, जवान हाके, आनंद पाटील, लोकेश गायकवाड, नरेंद्र पाटील, अजय गावंडे, कुणाल सोनवणे, शशीकांत पाटील, प्रकाश तायडे, नितीन पाटोल हे सहभागी होते.

Back to top button