Redmi चा फोन वापरता? बातमी आपल्यासाठी!  | पुढारी

Redmi चा फोन वापरता? बातमी आपल्यासाठी! 

पुढारी ऑनलाईन डेस्क 

Xiaomi चे दोन बजेट स्मार्टफोन Redmi 8 आणि Redmi 8A ला MIUI 12 Update मिळण्यास सुरुवात झाली आहे. MIUI 12 Update मिळाल्याने लाखो रेडमी 8आणि रेडमी 8 ए यूजर्सना फायदा होणार आहे. रेडमी 8ला मिळालेले नवीन अपडेट व्हर्जन MIUI V12.0.1.0.QCNINXM, तर रेडमी 8 ए ला मिळालेले व्हर्जन MIUI V12.0.1.0.QCPINXM आहे. (Redmi 8 and Redmi 8A have started getting MIUI 12 update in India) 

अधिक वाचा : बेस्ट 4G प्लॅन फक्त १६ रुपयांपासून!

Xiaomi ने लेटेस्ट सॉफ्टवेअर अपडेटच्या माध्यमातून दोन्ही Redmi Mobiles के यूजर्सना इंटरफेस-लेवलमध्ये बरेच बदल केले आहेत. अपडेट मिळाल्याने रेडमी 8 आणि रेडमी 8 ए के ऑपरेटिंग सिस्टम व्हर्जनमध्ये कोणताही बदल होणार नाही. म्हणजेच दोन्ही स्मार्टफोन Android 10 वर काम करतील.  शाओमीने MIUI 12 Update ला बॅच करून रेडमी 8 आणि रेडमी 8 ए यूजर्ससाठी रोलआउट केले आहे. बऱ्याच यूजर्सनी सोशल मीडियावर लेटेस्ट अपडेट मिळाल्याचे सांगितले आहे. ही अपडेट भारतीय यूजर्ससाठी आहे. 

अधिक वाचा : Whatsapp मध्ये आणखी एक भन्नाट फिचर!

काय बदल होणार? 

रेडमी स्मार्टफोन्सना जानेवारी 2021 अॅड्राँईड सिक्योरिटी पॅच करण्यात आले आहे. अपडेट नव्या ॲनिमेशन इफेक्ट्समध्ये येत आहे. MIUI 12 अपडेट Redmi 8 आणि Redmi 8A स्मार्टफोनमध्ये डार्क मोड ऑप्टिमाईज करतो. तसेच लँडस्केप व्ह्यू मध्ये कंट्रोल सेंटर लेआउटमध्ये सुधारणा झाली आहे. आपल्याला स्टेटस बार आणि नोटिफिकेशन शेडमध्ये सुधारणा झालेली दिसून येईल. 

अधिक वाचा : मिर्झापूरचा ‘मुन्ना’ आता दिसणार हटके भूमिकेत

रेडमी 8 ला मिळालेली अपडेट फाईल साईज 2.1 जीबी, तर रेडमी 8 ए स्मार्टफोनला मिळालेली अपडेट साईज 1.8 जीबी आहे. विशेष बाब म्हणजे ही अपडेट अॅड्राँईड 10 ओएसवर आधारित आहे. जर आपण रेडमी 8 किंवा रेडमी 8 ए स्मार्टफोनचा वापर करत असाल, तर आपल्याला सॉफ्टवेअर अपडेट नोटिफिकेशन मिळेल. 

Back to top button