Olya kajuchi bhaji : चविष्ठ ओल्या काजूची भाजी | पुढारी

Olya kajuchi bhaji : चविष्ठ ओल्या काजूची भाजी

बाजारात ओले काजू दिसले की, अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं.; पण त्या ओल्या काजूंची भाजी चविष्ट (Olya kajuchi bhaji ) होण्यासाठी नेमकी कोणती कृती वापरायची, हे अनेकांना उमगत नाही. त्यासाठीच ही रेसिपी काजूच्या चविष्ट भाजीची! (Olya kajuchi bhaji )

अनेकांना ढाब्यावर बनवलेल्या जेवणाची चव चाखायला आवडते. अशीच चव तुम्हाला घरी बनवलेल्या पदार्थांमधून मिळाली तर? चला तर मग ‘ओल्या काजूची भाजी’ अशा प्रकारे बनवा.

No Image

Recipe By स्वालिया शिकलगार

Course: लंच Cusine: महाराष्ट्रीयन Difficulty: : सोपे

Servings

५ minutes

Preparing Time

३० minutes

Cooking Time

३० minutes

Calories

kcal

INGREDIENTS

  1. अर्धा किलो ओले सोललेले काजू

  2. एक कांदा मध्यम आकाराचा

  3. मध्यम आकाराचे दोन बटाटे

  4. एक वाटी तेल

  5. एक छोटा चमचा हळद

  6. तीन चमचे मालवणी मसाला

  7. वाटणासाठी दोन कांदे

  8. अर्धी वाटी ओला खोवलेला नारळ

  9. अर्धी वाटी सुक्या नारळाचा किस

  10. अर्धा इंच आलं

  11. सोललेल्या लसणाच्या पाच पाकळ्या

  12. अर्धा चमचा बडीशेप

  13. तीन-चार काळे मिरे

  14. लवंग

  15. दालचिनीचा छोटा तुकडा

  16. दगडफूल

  17. थोडी खसखस

  18. तमालपत्राची एक-दोन पानं.

DIRECTION

  1. तीन कांदे उभे कापून ते तेलावर तांबूस रंगावर भाजून घ्या

  2. ओलं आणि सुकं खोबरंही वेगवेगळं भाजून घ्या

  3. सुकं खोबरं भाजताना त्यातच आलं-लसूण आणि वर म्हटलेला खडा मसाला टाका

  4. नंतर हे सर्व भाजलेलं साहित्य मस्त बारीक वाटून घ्या

  5. वाटण तयार झाल्यावर एका पसरट भांड्यात उरलेलं तेल टाकून ते कडकडीत तापल्यावर त्यात उरलेला एक कांदा बारीक चिरून टाका

  6. कांदा शिजल्यावर त्यात हळद-मसाला टाकून ते परतून घ्या

  7. कडेने तेल सुटू लागल्यावर त्यात पाणी टाका

  8. नंतर काजू आणि सोललेल्या बटाट्याचे मोठे तुकडे टाकून ढवळा

  9. थोड्या वेळाने वर तर्री आल्यावर दीड मोठे चमचे वाटण टाका

  10. चवीपुरतं मीठ टाका

  11. झाली काजूची भाजी तयार

NOTES

    Back to top button