Stock Market Opening Bell : व्‍यवहार सुरु हाेताच सेन्‍सेक्‍सने अनुभवली घसरण | पुढारी

Stock Market Opening Bell : व्‍यवहार सुरु हाेताच सेन्‍सेक्‍सने अनुभवली घसरण

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : जागतिक बाजारपेढेतील कमकुवत संकेताचे परिणाम आज देशातंर्गत शेअर बाजारात व्‍यवहार होतानाच दिसले. व्‍यवहार सुरु होताच सेन्सेक्स सुमारे 250 अंकांनी घसरला तर निफ्टीही 60 अंकांची घसरण अनुभवली. सेन्सेक्स सुमारे 72,900 च्या पातळीवर तर निफ्टी 22,150 च्या पातळीवर आला.

आयटी, बँकिंग आणि वाहन क्षेत्रात सर्वाधिक विक्री

आयटी, बँकिंग आणि वाहन क्षेत्रात सर्वाधिक विक्री झाली आहे. तर मेटल आणि फार्मा मध्ये खरेदी होत आहे. निफ्टी एशियन पेंट्स सर्वाधिक 4 टक्क्यांनी घसरला आहे.

डॉलरच्या तुलनेत रुपयाने मजबूत सुरुवात केली

आज डॉलरच्या तुलनेत रुपयाने दमदार सुरुवात केली. डॉलरच्या तुलनेत रुपया आज ५ पैशांनी मजबूत होऊन ८२.८९/$ वर उघडला.

Back to top button