Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, ‘या’ स्टॉक्समध्ये घसरण | पुढारी

Stock Market Updates | सेन्सेक्स, निफ्टी सपाट, 'या' स्टॉक्समध्ये घसरण

पुढारी ऑनलाईन : शेअर बाजाराने आज सोमवारी सुस्त सुरुवात केली. सुरुवातीलाच सेन्सेक्स आणि निफ्टी सपाट झाले. सकाळी १० वाजता सेन्सेक्स ३५ अंकांच्या वाढीसह ६६,१९५ वर तर निफ्टी १९,६५२ वर व्यवहार करत होता. बँकिंग, फायनान्सियल आणि एफएमसीजी स्टॉक्समध्ये घसरण दिसून येत आहे. (Stock Market Updates)

एशियन पेंट्स, कोटक बँक, बजाज फायनान्स, भारती एअरटेल हे शेअर्स घसरले आहेत. तर एनटीपीसी, पॉवर ग्रिड, टाटा स्टील, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स हे शेअर्स वाढले आहेत.

आशियाई बाजारातील स्थिती

बँक ऑफ जपानच्या अचानक धोरणात्मक बदलाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी आशियाई बाजारात तेजीचे वातावरण राहिले आहे. जपानचा निक्केई २२५ निर्देशांक १.०८ टक्के आणि चीनचा शांघाय कंपोझिट ०.६३ टक्के आणि हाँगकाँगचा हँगसेंग १.४४ टक्क्यांनी वाढला. (Stock Market Updates)

परदेशी गुंतवणूकदारांकडून विक्रीचा सपाटा

NSE डेटानुसार, परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी शुक्रवारी निव्वळ आधारावर १,०२४ कोटी रुपयांच्या भारतीय शेअर्सच्या विक्री केली. तर स्थानिक गुंतवणूकदारांनी १,६३४ कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले.

हे ही वाचा ;

Back to top button