Reliance Milkbasket Brand | रिलायन्स मिल्कबास्केट ब्रँड बंद करणार, मोठ्या प्रमाणात नोकरकपात?

Reliance Milkbasket Brand | रिलायन्स मिल्कबास्केट ब्रँड बंद करणार, मोठ्या प्रमाणात नोकरकपात?
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिलायन्स रिटेलच्या मालकीच्या मिल्कबास्केटने ब्रँड सध्याच्या कर्मचार्‍यांपैकी अंदाजे 25-30 टक्के म्हणजेच  सुमारे 600 कर्मचारी  कमी करण्याच्या तयारीत आहे. या घडामोडींनंतर, रिलायन्स 'जिओ स्मार्ट डेली' नावाचा एक नवीन प्लॅटफॉर्म सादर करणार आहे आणि त्यानंतर मिल्कबास्केट ब्रँड पूर्णपणे बंद करेल. पण कंपनीच्या एका प्रवक्त्याने या नोकरकपातीच्या वृत्ताचे खंडन केले आहे. परंतु या प्रकरणाची माहिती असलेल्या सूत्रांनी सांगितले की या नोकरकपातीमध्ये संपूर्ण ऑफलाइन विपणन, विक्री आणि मुख्य कार्यालय टीमचा समावेश आहे.(Reliance Milkbasket Brand)

कंपनीबाहेरील संधी शोधण्याचे आवाहन

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिल्कबास्केट त्यांचे ऑफलाइन विपणन, विक्री आणि मुख्य कार्यालयातील टीम पूर्णपणे काढून टाकेल. मिल्कबास्केटने आपल्या बहुतेक कर्मचार्‍यांना राजीनामा देण्याचा विचार करावा आणि पुढील काही आठवड्यांत कंपनीबाहेरील संधी शोधण्याचे आवाहन केले आहे. या प्रक्रियेदरम्यान, रिलायन्स रिटेल समूह कंपन्यांमधील मिल्कबास्केटच्या काही गटांना सामावून घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु यामुळे अनेक शंभर कर्मचारी सदस्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Reliance Milkbasket Brand : जिओ स्मार्टमध्ये एकत्रीकरण 

सूत्रांच्या माहितीनुसार, उर्वरित मिल्कबास्केट टीम जिओ स्मार्टमध्ये समाविष्ट होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये, प्लॅटफॉर्मने जिओमार्ट सोबत एकत्रीकरण केल्यानंतर सह-संस्थापक यतीश तलवाडिया, चीफ ऑपरेटिंग ऑफिसर अभिनव इमांडी आणि मुख्य वित्तीय अधिकारी गौरव श्रीवास्तव यांच्या वरिष्ठ आणि मध्यम-स्तरीय पदांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले.

कंपनीने दिले स्पष्टीकरण….

सुत्रांच्या माहितीनुसार, रिलायन्सच्या प्रवक्त्याने मिल्कबास्केटमधील पुनर्ब्रँडिंग आणि नोकरकपातीच्या वृत्ताचे खंडन करत म्हटलं आहे की, "आम्ही हे सांगू इच्छितो की मिल्कबास्केट, एक ब्रँड म्हणून वाढत आहे आणि त्यांच्या ग्राहकांना सतत सेवा देत आहे. याशिवाय, नोकरकपातीची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. हा व्यवसाय JioMart सोबत एकत्रित केला जात आहे. एकत्रीकरणाचा एक भाग म्हणून, समुहातील कार्यांमध्ये काही भूमिकांचे पुनर्वाटप केले जाऊ शकते. परंतु आम्ही कोणत्याही कर्मचार्‍याला काढून टाकत नाही."

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news