नाशिक, दिंडाेरी मतदारसंघांकरिता १७ हजार २८ अधिकारी-कर्मचारी नियुक्त

नाशिक, दिंडाेरी मतदारसंघांकरिता १७ हजार २८ अधिकारी-कर्मचारी नियुक्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघांसाठी सोमवारी (दि. २०) सकाळी 7 ते सायंकाळी ६ या वेळेत मतदान घेण्यात येणार आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. ईव्हीएम- व्हीव्हीपॅट तसेच मतदान साहित्यांसह अधिकारी व कर्मचारी रविवारी (दि. १९) दुपारी केंद्रांकडे रवाना झाले.

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यामध्ये जिल्ह्यात मतदान पार पडणार आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून ३१ उमेदवार रिंगणात आहेत, तर दिंडोरी मतदारसंघातून १० उमेदवार नशीब आजमावत आहेत. निवडणुकीत शनिवारी (दि. १८) सायंकाळी 6 वाजता प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्यामुळे निवडणुकीतील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतदानाकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दोन्ही मतदारसंघांत सोमवारी मतदान पार पडणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून त्यासाठीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

नाशिक व दिंडाेरी मतदारसंघांकरिता १७ हजार २८ अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये ५ हजार ८२ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. हे सर्व कर्मचारी त्या-त्या विधानसभा मतदारसंघात ईव्हीएम-व्हीव्हीपॅट तसेच मतदान साहित्यासह रविवारी (दि. १९) दुपारपर्यंत मतदान केंद्रांकडे रवाना झाले आहेत. तत्पूर्वी संबंधितांना शेवटचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कर्मचारी व मतदान साहित्याच्या वाहतुकीसाठी १ हजार २५२ वाहने तैनात केली आहेत. या वाहनांमधून पोलिस बंदोबस्त कर्मचारी नियुक्तीच्या ठिकाणी रवाना होतील. सोमवारी (दि. २०) मतदान संपल्यावर कर्मचारी त्या-त्या विधानसभा मतदारसंघांत उभारलेल्या स्ट्राँगरूममध्ये ईव्हीएम जमा करतील. त्यानंतर स्ट्रॉगरूम येथून एकत्रितरीत्या हे मशीन्स अंबड येथील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातील मतमोजणी केंद्रात रवाना केले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.

मतदान केंद्रे
नाशिक : 1910
दिंडोरी : 1922

एकूण मतदार
नाशिक : २० लाख ३० हजार १२४
दिंडोरी : १८ लाख ५३ हजार ३८७

हे आहेत उमेदवार
नाशिक लोकसभा – अरुण काळे, हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, अमोल कांबळे, कमलाकर गायकवाड, करण गायकर, कांतीलाल जाधव, कैलास चव्हाण, जयश्री पाटील, ॲड. झुंजार आव्हाड, दर्शना मेढे, भाग्यश्री अडसूळ, यशवंत पारधी, वामन सांगळे, आरीफ मन्सुरी, प्रकाश कनोजे, कोळप्पा धोत्रे, गणेश बोरस्ते, चंद्रकांत ठाकूर, चंद्रभान पूरकर, जितेंद्र भाभे, तिलोत्तमा जगताप, दीपक गायकवाड, देवीदास सरकटे, धनाजी टोपले, शांतिगिरी महाराज, सचिनराजे देवरे, सिद्धेश्वरानंद सरस्वती, सुधीर देशमुख, सुषमा गौराणे, सोपान सोमवंशी.

दिंडोरी लोकसभा – तुळशीराम खोटरे, डॉ. भारती पवार, भास्कर भगरे, किशोर डगळे, गुलाब बर्डे, मालती ढोमसे, भारत पवार, अनिल बर्डे, दीपक जगताप, बाबू भगरे.

ईव्हीएम-व्हीव्हीपॅट : 
मतदारसंघ     बॅलेट युनिट         कंट्रोल युनिट     व्हीव्हीपॅट
नाशिक           4480                 2290              2480
दिंडोरी            2305                2305              2496

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news