Share market update : आरबीआयच्या रेपो रेट दरवाढीने सेन्सेक्स वधारला, रुपया मजबूत | पुढारी

Share market update : आरबीआयच्या रेपो रेट दरवाढीने सेन्सेक्स वधारला, रुपया मजबूत

पुढारी ऑनलाईन डेस्क : रिझर्व्ह बँकेने अपेक्षेनुसार रेपो रेट वाढवल्याने सेन्सेक्सने (Share market update) सुमारे ३०० हून अधिक अंकांनी उसळी घेतली. सेन्सेक्स ५८,५०० च्या वर व्यवहार करत आहे. तर निफ्टी ८० अंकांनी वधारला आहे. रुपया प्रति डॉलर ७९ च्या वर व्यवहार करत आहे. भारत ही आशियातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेतील सततच्या उच्च चलनवाढीला तोंड देण्यासाठी आरबीआयने तिसर्‍यांदा महत्त्वाच्या रेपो दरात वाढ केली. यामुळे शेअर बाजार उसळला आहे. (Share market update)

RBI च्या निर्णयानंतर भारताचे १० वर्षांचे बेंचमार्क बाँड उत्पन्न (benchmark bond yield) ७.२३१७ टक्क्यांनी वाढले, तर रुपया प्रति डॉलर ७९.०३ वर व्यवहार करत होता. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज शुक्रवारी चलनविषयक धोरण जाहीर केले. आरबीआयने रेपो दर ५० बेस पॉईंट्सने वाढवल्याने तो ५.४० टक्क्यांवर पोहोचला आहे. ८ जून रोजी झालेल्या आधीच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने रेपो दर ५० बेसिस पॉइंट्सने वाढवून ४.९० टक्के केला होता.

रिझर्व्ह बँकेने (RBI) सलग तिसऱ्यांदा रेपो रेट (RBI Monetary Policy) वाढवला आहे. यावेळी रेपो दर ५० बेस पॉईंट म्हणजे ०.५० टक्क्याने वाढवला आहे. यामुळे रेपो रेट ५.४० टक्क्यांवर पोहचला आहे. यामुळे कर्जे महागणार आहे.

२०२२-२३ मध्ये महागाई दर ६.७ टक्के राहण्याचा अंदाज आहे; तर २०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत किरकोळ महागाई (सीपीआय) दर ५ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांता दास यांनी म्हटले आहे. रेपो रेट सलग तिसऱ्यांदा वाढवल्यामुळे कोरोना संसर्गाच्या आधीच्या स्तरावर पोहोचला आहे.

२०२२-२३ मध्ये GDP वृद्धीचा अंदाज ७.२ टक्के एवढा कायम ठेवण्यात आला आहे. GDP वृद्धी पहिल्या तिमाहीत १६.२ टक्के, दुसऱ्या तिमाहीत ६.२ टक्के, तिसऱ्या तिमाहीत ४.१ टक्के आणि चौथ्या तिमाहीत ४ टक्के राहण्याचा अंदाज असल्याचे दास यांनी म्हटले आहे.
रुपयातील अस्थिरता मर्यादित करण्यासाठी परकीय चलनाचा साठा कमी होऊनही भारताचा चलनसाठा जागतिक स्तरावर चौथ्या क्रमांकावर असल्याचे आऱबीआय गर्व्हनर दास यांनी म्हटले आहे. आरबीआय रुपयाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे. बँकेच्या पत वाढीचा (credit growth) वेग १४ टक्के आहे जो मागील वर्षी ५.५ टक्के होता. मुदत ठेवींच्या दरात वाढ झाल्याने आर्थिक क्षेत्रासाठी तरलता वाढली पाहिजे. भारतीय अर्थव्यवस्थेला भौगोलिक-राजकीजोखमींसारख्या जागतिक घटकांमुळे अडचणींचा सामना करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले आहे. (RBI Monetary Policy)

Back to top button