LIC stock : कमकुवत जागतिक संकेताचा LIC ला मोठा फटका, शेअर्स घसरल्याने भागधारकांच्या १ लाख कोटींचा चुराडा! | पुढारी

LIC stock : कमकुवत जागतिक संकेताचा LIC ला मोठा फटका, शेअर्स घसरल्याने भागधारकांच्या १ लाख कोटींचा चुराडा!

पुढारी ऑनलाईन डेस्क

कमकुवत जागतिक संकेतामुळे आज भारतीय शेअर बाजारात घसरण पहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स ३५० अंकांनी खाली आला होता. त्यानंतर दुपारी ही घसरण कमी झाली. निफ्टीही खाली येऊन १६,५०० वर व्यवहार करत आहे. कमकुवत जागतिक संकेताचा सर्वात मोठा फटका भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीला (LIC) बसला आहे. LIC चे शेअर्स (LIC stock) सुरुवातीच्या व्यवहारात जवळपास २ टक्क्यांनी घसरले. LIC समभाग BSE वर १.७१ टक्क्यांनी घसरून ७८६.६० रुपयांवर आले. याआधी हे समभाग ८००.२५ रुपयांवर बंद झाले होते.

सार्वजनिक क्षेत्रातील या विमा कंपनीचे बाजार भांडवल (market capitalisation) आज ६ लाख २४२ कोटी रुपयांवरुन ४ लाख ९७ हजार ३३४ कोटींवर घसरले आहे. आजच्या घसरणीनंतर एलआयसीच्या शेअर्सहोल्डर्संना गेल्या १५ ट्रेंडिग सत्रात १ लाख २ हजार ९०८ कोटींचा फटका बसला आहे. (LIC stock)

भारतातील सर्वात मोठ्या विमा कंपनीच्या समभागांविषयी गुंतवणूकदारांची भावना नकारात्मक राहिल्याने एलआयसीच्या समभागाने आज ७८६.६० रुपयांच्या निचांकी पातळी गाठली. शेअर बाजारात पदार्पण केल्याच्या दोन आठवड्यांच्या आत एलआयसीचे समभाग लिस्टिंग किमतीपासून ९.२९ टक्के म्हणजेच ८० रुपयांनी घसरले आहेत.

एलआयसी विमा कंपनीचा शेअर (LIC Listing) १७ मे रोजी बीएसई आणि एनएसईवर सुचिबद्ध झाला होता. दोन्ही स्टॉक एक्सचेंजवर एलआयसी शेअरचे लिस्टिंग इश्यू प्राइसच्या तुलनेत डिस्काउंटमध्ये झाली होती. पण यामुळे एलआयसी IPOमध्ये पैसे लावणाऱ्या गुंतवणूकदारांची निराशा झाली होती. पॉलिसी होल्डर्सचीदेखील निराशा झाली. ६० रुपयांचा डिस्काउट असूनही गुंतवणूकदारांना नफा मिळवण्यासाठी संधी मिळाली नव्हती.

एलआयसीचे बाजार मूल्य ६ लाख २४२ कोटी रुपये आहे. पण एलआयसी शेअरच्या लिस्टिंगच्या पहिल्या काही मिनिटांत बाजार मुल्य ५ लाख ५७ हजार ६७५ कोटी रुपयांवर आले होते. पण हे बाजार मुल्य हिंदूस्तान युनिलिवर आणि आयसीआयसीआयच्या तुलनेत अधिक होते. कमजोर लिस्टिंग झाले असतानाही एलआयसी पाचवी सर्वात मोठी बाजार मुल्य असणारी कंपनी बनली आहे.

Back to top button