उच्‍च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी ‘हा’ उपाय ठरेल लाभदायक | पुढारी

उच्‍च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी 'हा' उपाय ठरेल लाभदायक

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उच्च रक्तदाब (High blood pressure) हा शब्‍द आता आपल्‍या जगण्‍यातला एक भाग झाला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर याचे रुग्‍ण वाढत आहेत. पूर्वी वयोमानामुळे होणार हा विकार आता आधुनिक जीवनशैलीमुळे तरुणाईला विळखा घालत आहे. उच्‍च रक्‍तदाब हा जगभरातील अकाली मृत्‍यू होण्‍यास कारणीभूत प्रमुख घटकांपैकी एक झाला आहे. इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हायपरटेन्शनच्या नवीन मार्गदशंक तत्‍वांमध्‍ये नियमित ध्‍यान याचाही समावेश झ्राला आहे. नियमित दररोज ४५ मिनिटे ध्‍यान करणे हा उच्‍च रक्‍तदाबावर नियंत्रण मिळविण्‍यासाठी लाभदायक उपाय ठरत आहे, असे नवीन मार्गदर्शक तत्त्‍वे सांगतात.

संबंधित बातम्‍या :

रक्‍तदाबावर नियंत्रण मिळविण्‍यासाठी इंटरनॅशनल सोसायटी ऑफ हायपरटेन्शनच्या इतर टिप्समध्ये संगीत ऐकणे, योगासने आणि त्‍याचबरोबर ध्‍यान करण्‍याचाही समावेश करण्‍यात आला आहे. सर्वसाधारणपणे उच्‍च रक्‍तदाबावर नियंत्रण मिळविण्‍यासाठी धूम्रपान सोडा आणि मीठ कमी करा असा सल्‍ला दिली जातो. जर्नल ऑफ हायपरटेन्शनमध्ये प्रकाशित झालेल्या पोझिशन पेपरनुसार, रक्‍तदाबावर नियंत्रण मिळवण्‍यासाठी शरीर आणि मन या दोघांचाही विचार होण्‍याची गरज असल्‍याचे नमूद करण्‍यात आले आहे. तसेच नियमित ध्‍यान करणे लाभदायक असल्‍याचे नमूद केले आहे.

High blood pressure : दररोज किमान अर्धा तास स्‍वत:साठी वेळ द्या

यासंदर्भात ‘बीबीसी’शी बोलताना इंग्‍लंडमधील उच्‍च रक्‍तदाब उपचार तज्ज्ञ प्रोफेसर ब्रायन विल्‍यम्‍स यांनी सांगितले की, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी प्रणालीवरील तणावाचे परिणाम कमी रुग्‍णांनी स्‍वत:साठी दिवसातील अर्धा तास तरी वेळ काढायल हवा. थोडा वेळ विश्रांती, संगीत ऐकणे, मोकळ्या हवेत फिरायला जाणे किंवा जिममध्‍ये व्‍यायाम करणे आवश्‍यक आहे. त्‍याचबरोबर ध्‍यान करणेही फायदेशीर ठरते.

ध्‍यानामुळे होते रोजच्‍या ताण-तणाव दूर होण्‍यास मदत

दररोजच्‍या जीवनशैलीत पुरेशी झोप, नियमित व्‍यायाम अत्‍यावश्‍यक गोष्‍टी आहेत. उच्‍च रक्‍तदाबामध्‍ये झोपेची गुणवत्ता
महत्त्‍वचाी ठरते. सात तास चांगली झोप मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. झोप न लागणे आणि कमी न होणे यामुळे तणावाला कारणीभूत ठरतात. ध्यान, दीर्घ श्वासोच्छ्वास, योग आणि माइंडफुलनेस यासारख्या रोजच्या ताण-तणाव दूर करण्यास मदत होते. तुम्‍ही जगण्‍यातल्‍या सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करून कृतज्ञतेचा सराव करण्याचा विचार करा, असा सल्‍लाही ते देतात.

High blood pressure : जीवनशैलीतील बदलास असावे प्राधान्‍य

अनेक देशांमधील वाढते वायू प्रदूषण हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या कार्यावर परिणाम होत असल्‍याचे दिसत आहे. उच्च रक्तदाबावर उपचार आणि प्रतिबंध करण्यासाठी जीवनशैलीतील बदल हा प्रथम श्रेणीचा दृष्टीकोन असला पाहिजे, असेही ते म्‍हणाले.

उच्‍च रक्‍तदाब कमी करण्‍यासाठी मीठ वापरावर हवी मर्यादा

ब्लड प्रेशर यूकेच्या डॉ. पॉलीन स्विफ्ट यांनी सांगितले की, रक्तदाब कमी करण्याचा एक जलद मार्ग म्‍हणजे मीठ वापरावर मर्यादा घालणे. तुम्ही तुमच्या जेवणात मीठाचे प्रमाण कमी करा. अतिरिक्‍त मीठ खाल्ल्‍याने तुमच्या शरीरात अतिरिक्त पाणी साठते, ज्यामुळे तुमचा रक्तदाब वाढतो.

हेही वाचा : 

 

 

Back to top button