बेळगाव : हिरेबागेवाडीत दिवसभरात नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह  | पुढारी

बेळगाव : हिरेबागेवाडीत दिवसभरात नऊ जण कोरोना पॉझिटिव्ह 

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा

बेळगाव जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून हिरेबागेवाडी येथे दिवसभरात नऊ जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत 54 जणांना कोरोनाची बाधा झाली असून प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

 राज्याच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण खात्याने सकाळी दिलेल्या अहवालानुसार हिरेबागेवाडी येथे सहा जणांना कोरोनाची लागण झाली होती. पण संध्याकाळी दिलेल्या दुसर्‍या अहवालात पुन्हा 8 वर्षांच्या बालकासह 20 वर्षाचा तरुण व 30 वर्षाच्या महिला अशा तिघांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. 

हिरेबागेवाडीत अंगणवाडी सेविका आणि निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांसह नऊ जणांना बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 54 झाली आहे.

Back to top button