हेडफोनवर गाणी ऐकत झोपताय? | पुढारी | पुढारी

हेडफोनवर गाणी ऐकत झोपताय? | पुढारी

मेघना ठक्‍कर

मोबाईल आणि त्यावर गाणी ऐकणे हे आता काही नवीन नाही.रात्रभर कानात इअरफोन घालून गाणी ऐकत झोपण्याची सवय अनेकांना असते. रात्रीच कशाला चालता-बोलता, वाहन चालवताना बहुतेकजण कानात हेडफोन टाकून गाणी ऐकणारे शेकडोजण आहेत; पण हेडफोनचा सातत्याने वापर करणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. अनेक अभ्यासांतून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की, झोपताना हेडफोन्स लावून गाणी ऐकणे हे कानांसाठी धोकादायक आहे; पण मेंदू आणि झोप यांच्यावरही याचा प्रभाव पडतो. रात्री इअरफोन कानात टाकून झोपण्याने काय धोके होतात पाहूया. (what are the dangers of sleeping with earphones) 

शरीराचे घड्याळ बिघडते

संगीत ऐकण्यामुळे आराम मिळतो, बरे वाटते.त्यामुळे झोपताना गाणी ऐकत झोपणे ही सवयच बहुतेकांना लागली आहे; पण या सर्वात शरीराचे स्वतःचेच एक घड्याळ असते. त्याला सरकैडियन रिदम असे म्हटले जाते. या घडाळ्यानुसार आपल्याला चालावे लागते. नियमितपणे कृत्रिम आवाज ऐकत झोपण्याची सवय होणे ही नक्‍कीच अनारोग्यकारी सवय आहे. त्यामुळे शरीराचे घड्याळ बिघडते.

मेंदू सतत कार्यशील राहते 

रात्री उशिरापर्यंत गाणी ऐकत हेडफोन लावून झोपल्याने झोपेवर परिणाम होतो. बहुतेकदा गाणी ऐकण्यासाठी हेडफोन्स वापरताना स्मार्टफोन्सचा वापर केला जातो. त्यामुळे फोन सतत डोक्याशी राहतो. एवढेच नव्हे तर आराम करताना, झोपताना फोन आपल्या जवळच असतो. मेंदूला झोपेत आराम मिळणे अपेक्षित असते; मात्र गाणी ऐकत झोपल्यामुळे मेंदू सातत्याने कार्यशील राहतो.

कानाचे नुकसान

गाणी ऐकत झोपल्यामुळे मेंदू पूर्णपणे शांत राहू शकत नाही. मेंदूचा काही भाग सतत कार्यरत राहतो. त्यामुळे झोपेत अडथळा निर्माण होतो. याच कारणामुळे शरीराला आवश्यक ती 8 तासांची झोप मिळत नाही. तसेच हृदयाचे ठोके वाढतात. त्यामुळे आरोग्यासाठी हे नुकसानकारक आहे. झोपताना उच्च आवाजात इअरफोन लावून गाणी ऐकल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होतात. झोपताना कानात इअरफोन लावल्याने कानाच्या त्वचेवर दबाव पडतो आणि त्वचेसंबंधी समस्या निर्माण होतात. सतत इअरफोन लावल्याने कानात वॅक्स तयार होते आणि ऐकण्याच्या क्षमतेवर प्रभाव पडतो.

रात्री झोपताना संगीत ऐकू नये का?

रात्री चांगली झोप येण्यासाठी संगीत ऐकण्यात फार काही चुकीचे नाही. पण झोपताना इअरफोन लावून झोपण्याची काही गरज नाही. ही सवय सोडवणे ही कठीण गोष्ट आहे, पण रेडिओ लावून गाणी ऐकू शकता किंवा झोप आली की हेडफोन काढून मोबाईल लांब ठेवून द्यावा. यामुळे नैसर्गिक झोपेचे वेळापत्रकात अडथळा येतो. त्यामुळे रात्रीची झोप नैसर्गिकरीत्या पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अर्थात त्यासाठी संगीतावर अवलंबून राहण्याची गरज नाही. झोपण्यापूर्वी दूध पिणे, पुस्तक वाचणे यामुळे चांगली झोप लागू शकते. ही सवय आपल्या जीवनशैलीत लावून घ्यावी.

कानाचा

संसर्ग

हेडफोन मित्रांनाही वापरण्यास देत असाल तर मात्र संसर्ग एकमेकांना देत आहोत हेदेखील लक्षात ठेवले पाहिजे. त्यामुळे कानाला संसर्ग होऊ शकतो.

 

Back to top button