फायब्रोएडेनोमा आणि होमिओपॅथिक उपचार | पुढारी

फायब्रोएडेनोमा आणि होमिओपॅथिक उपचार

स्तनामधील गाठ ही सर्वसामान्यपणे महिलांमध्ये भीतीचे तसेच काळजीचे कारण असते; पण फायब्रोएडेनोमा ही सर्वात सामान्य व तारुण्यात होणारी कर्करोग नसणारी स्तनातील गाठ असते.

फायब्रोएडेनोमा म्हणजे स्तनाचे तंतूयुक्त आणि ग्रंथीतील तंतू यांची असामान्य वाढ असते. सर्वसामान्यपणे 15 ते 30 वयोगटांतील महिलांमध्ये ही आढळते.

फायब्रोएडेनोमा ही गाठ शक्यतो दुखणारी नसते. ही गाठ मऊ किंवा कठीण असते. ही गाठ हानीकारक नसते. स्तनातील ही गाठ एका स्तनात किंवा दोन्ही स्तनात असते. या गाठीमुळे काखेत अवधान येणे (श्रूाहिपेवश शपश्ररीसाशपीं) हे लक्षणे पाहायला मिळत नाही.

संबंधित बातम्या

ही गाठ होण्याची तशी ठराविक कारणे सांगता येत नाहीत; पण तारुण्यात होणार्‍या संप्रेरक बदलामुळे गाठ होऊ शकते. संप्रेरक ( इस्ट्रोजन हार्मोन) च्या जास्त वाढीमुळे ही गाठ होऊ शकते. त्यासाठी तपासणीची मदत घ्यावी लागते.

स्तनातील गाठीची तपासणी तुम्ही घरच्या घरी करून बदल लक्षात घेऊ शकता. तुमच्या महिन्याच्या मासिक पाळीनंतर दर तीन ते पाच दिवसांनी तुम्ही स्तनाचे परीक्षण करू शकता. यासाठी

स्तनातील स्तनाग्र व स्तनाग्र परीवलय आकुंचन पावले का ते पाहावे.
दोन्ही स्तनांची त्वचा सामान्यपणे एक सारखी असली पाहिजे.
स्तनातील ग्रंथीमधून स्त्राव आहे का? त्या स्त्रावाची छटा पांढरी किंवा पिवळी किंवा लालसर आहे का? लालसर स्त्राव असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे असते.

वैद्यकीय तपासणी

1) दोन्ही किंवा एका स्तनाची अल्ट्रासाऊंड तपासणी सर्वसामान्यपणे तीस वर्षांच्या आतील महिलांमध्ये उपयुक्त ठरते.

2) मॅमोग्राफी सर्वसामान्यपणे तीस वर्षांच्या वरील महिलांमध्ये उपयुक्त ठरते.

3) एम.आर.आय.- मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग- स्तनाचे कर्करोग व गाठीची व्यापकता या तपासणीत कळते.

4) फाईन नीडल एस्पिरेशन साईटॉलॉजी – गाठीचे निदान या टेस्टमध्ये केले जाते.

5) एक्सिजनल बायोप्सी सामान्यपणे हा तपासणीचा पुढचा टप्पा.

निदानानंतर उपचार पद्धती ही गाठीचा आकार, गाठीचा प्रकार व गाठीसोबत असणारे दुखणे यावर ठरते. जेव्हा स्तनाच्या गाठीचे निदान कर्करोग होतो तेव्हा गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते. तसेच शस्त्रक्रियेसोबत किमोथेरपी व रेडिएशनचा सल्ला दिला जातो.
आताच्या काळी तपासणीमध्ये झालेले बदल आपणास अचूक निदान देऊन जातात.

पण फायब्रोएडेनोमामध्ये शस्त्रक्रियेने गाठ काढणे हे गाठीचा आकार, त्याचप्रमाणे वेदना या गोष्टींवर अवलंबून असते. गाठीचा प्रकार पाहून त्यावर शस्त्रक्रियेचा सल्ला दिला जातो.

फायब्रोएडेनोमामुळे महिलांमध्ये होणारी काळजी व भीती तसेच त्यागाठीबद्दल अनेक प्रश्न पडलेले असतात. या महिलांना होमिओपॅथिक उपचार पद्धती फारच गुणकारी ठरू शकते. होमिओपॅथिकमध्ये माणसाच्या आजाराचा तसेच त्याच्या स्वभावाचा विचार करून औषधे दिली जातात.

स्तनाची गाठ जेव्हा तारुण्यात महिलांना होते तेव्हा प्रत्येक वेळी शस्त्रक्रिया हाच पर्याय नसतो. शस्त्रक्रिया लांबवण्यात किंवा रोखण्यात होमिओपॅथिक उपचार पद्धती मदत करते. त्यामुळे होमिओपॅथिक औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करणे योग्य ठरते.

त्यामध्ये कल्केरिया कार्ब, कल्केरिया फ्लोर, सिलिका यांसारखी होमिओपॅथिक औषधे उपयुक्त ठरतात; पण ती डॉक्टरांच्या सल्ल्याने गाठीच्या तपासण्या करून घ्यावीत.

Back to top button