Indian Monuments : महिलांनी साकारलेल्‍या ऐतिहासिक वास्तू माहित आहेत?  | पुढारी

 Indian Monuments : महिलांनी साकारलेल्‍या ऐतिहासिक वास्तू माहित आहेत? 

भारतात अभिजात आणि समृद्ध सामाजिक-सांस्कृतिक वारसा असणार्‍या ऐतिहासिक वास्तू जगभरातील पर्यटकांच्‍या आकर्षणाचे केंद्र ठरत आहेत.  देशभरात असलेल्या या वास्तू बहुतांश करून पुरुष शासकांनी बांधलेली पाहायला मिळतात;पण यातील काही वास्‍तू महिलांनी साकारल्‍या आहेत.  पाहूया, आपला समृद्‍ध वारसा साकारणार्‍या ‘या’ महिला कोण आहेत  आणि त्‍यांनी काेणत्‍या वास्तू ( Indian Monuments) साकारल्‍या.

१. विरूपाक्ष मंदिर-कर्नाटक

कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात पट्टडकल येथील विरूपाक्ष मंदिर जगप्रसिद्‍ध आहे.  हे मंदिर भगवान शिवाला समर्पित आहे. राणी लोकमहादेवी यांनी आठव्या शतकात त्यांचे पती विक्रमादित्य दुसरेच्या यांच्‍या स्मरणार्थ हे मंदिर बांधले होते.

विरूपाक्ष मंदिर-कर्नाटक www.pudhari.news
विरूपाक्ष मंदिर-कर्नाटक

2. इत्माद उद दौला कबर-आग्रा

मुघल सम्राट शाहजहानने त्याची पत्नी मुमताजच्या  स्मरणार्थ आग्रा  येथे ताजमहाल बांधला. हे जगातील आश्चर्यांपैकी एक मानले जाते. आग्रा येथे इत्माद उद दौलाची कबर. ही कबर १६२२-१६२८ च्या दरम्यान नूरजहाँ यांनी त्‍यांचे वडील मिर्झा घियास बेग यांच्या स्मरणार्थ बांधली  हाेती.

इत्माद उद दौला कबर-आग्रा
इत्माद उद दौला कबर-आग्रा

3. राणी की वाव – गुजरात

सरस्वती नदीच्या काठावर बांधलेली, वास्तुशैलीचा एक सुंदर नमुना असलेले राणी की वाव हे गुजरात राज्यात पाटण येथे पाहायला मिळेल. ११ व्या व्या शतकात राणी उदयमतीने आपला पती सोळंकी घराण्यातील राजा भीम पहिला याच्या स्मरणार्थ ही विहिर बांधली होती.सात स्तर असणाऱी ही विहिर साधारण ६४ मीटर लांब आणि २० मीटर रुंद असणारी ही वाव २७ मीटर खोल आहे. आजूबाजूच्या भिंतीवर अतिशय सुरेख शिल्पे बनवलेली आहेत. विहिरीच्या चौथ्या स्तरावरून विहिरीच्या समोरील भिंतीकडे पहिले असता शेषशायी विष्णूची अतिशय सुरेख मूर्ती दिसते. प्रेक्षक आणि विष्णू मूर्ती यांच्यामध्ये एका मजल्याचे बांधकाम येत असल्याने छोट्याश्या फटीतून ही मूर्ती बघावी लागते. २२ जून २०१४ मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या स्थळाचा समावेश झाला आहे.

राणी की वाव, गुजरात

४. मोहिनीश्वर शिवालय मंदिर, काश्‍मीर

राणी की वाव, गुजरात काश्मीर खोऱ्यातील गुलमर्ग शहराच्या मध्यभागी मोहिनीश्वर शिवालय मंदिर वसले आहे. महाराणी शंकर मंदिर म्हणूनही याला ओळखले जाते. डोगरा घराण्यातील राजे हरी सिंह यांच्या पत्नी मोहिनीबाई सिसोदिया यांनी १९१५ मध्ये हे मोहिनीश्वर शिवालय मंदिर बांधले. गुलमर्ग शहराच्‍या कानाकोपऱ्यातून  मंदिर दिसेल अशा याची रचना केली आहे.

मोहिनीश्वर शिवालय मंदिर, काश्‍मीर

५. मिरजन किल्ला, कुमटा

राणी चेन्नाभैरदेवी यांनी मिरजन किल्ला बांधला.  अनेक युद्धांचा साक्षीदार ठरलेली  ही वास्तू कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील अघनाशिनी नदीच्या काठावर आहे.  इ.स. १५५२ ते १६०६ असा तब्बल ५४ वर्षे हा किल्‍ला गेरसोप्पाची राणी चेन्नाभैरादेवी यांच्‍या अधिपत्याख्याली होता.

मिरजन किल्ला, कुमटा www.pudhari.news
मिरजन किल्ला, कुमटा

६. हुमायूनची कबर, दिल्ली

दिल्लीतील मुघल सम्राट हुमायून यांची कबर जगप्रसिद्‍ध आहे . १५५६ मध्ये मुघल सम्राट हुमायूनच्या निधनानंतर हमीदा बानो बेगम यांनी १५६९ मध्‍ये ही कबर बांधली. या समाधीची रचना मीराक नावाच्या पर्शियन वास्‍तुरचनाकाराने केली हाेती.

इत्माद उद दौला कबर-आग्रा
हुमायूनची कबर, दिल्ली

७. लाल दरवाजा मशीद, जौनपूर

उत्तर प्रदेशातील जौनपूर शहराच्या बाहेरील भागात लाल मशीद आहे. ती संत सय्यद अली दाऊद कुतुबुद्दीन यांना समर्पित केली आहे. सुलतान महमूद शर्कीची राणी राजे बीबी यांनी १४४७ मध्ये ती बांधली होती. इमारतीच्या मुख्य दरवाजाचा दगड हा चुवार येथून मागवलेला होता.

लाल दरवाजा मशीद, जौनपूर
लाल दरवाजा मशीद, जौनपूर

८. माहीम कॉजवे, मुंबई

सालसेट बेटाला माहीमशी जोडण्यासाठी १८४१-१८५६ या वर्षांत माहीम कॉजवे (मुंबई) बांधण्यात आला. महीम आणि वांद्रे फेरीतून जाताना अनेकांना जीव गमवावा लागला. बेटांमधला भाग दलदलीचा होता. यामूळे कॉजवेची गरज भासली. या प्रकल्पासाठी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने निधी देण्यास नकार दिला होता. तेव्हा लेडी आवाबाई जमशेटजी जीजीभॉय पहिल्या बॅरोनेट सर जमशेटजी जीजीभॉय यांच्या पत्नी यांनी कॉजवे बांधण्यासाठी तब्बल १, ५७,००० ची देणगी दिली.

माहीम कॉजवे, मुंबई
माहीम कॉजवे, मुंबई

९. खैर अल-मनाझील

मुघल स्थापत्यकलेचा नमूना असलेली, नवी दिल्ली येथील स्थित खैर अल-मनाझील ही ऐतिहासिक मशीद १५६१ मध्ये सम्राट अकबराच्या ओल्या परिचारिका आणि त्याच्या दरबारातील एक प्रभावशाली स्त्री, महाम अंगाने बांधली होती.मशीद ही दुमजली आहे. या वास्तूचे एक वैशिषट्य म्हणजे या मशिदेचे प्रवेशद्वार हे लाल वाळूचा दगड वापरून बांधण्यात आले आहे.

खैर अल-मनाझील
खैर अल-मनाझील

हेही वाचा : 

Back to top button