आजपासून मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी सुरू, घरबसल्या असा बुक करा तुमचा स्लॉट | पुढारी

आजपासून मुलांच्या लसीकरणासाठी नोंदणी सुरू, घरबसल्या असा बुक करा तुमचा स्लॉट

पुढारी ऑनलाईन: 3 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या लहान मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून नोंदणी सुरू होत आहे. सध्या ही लस 15 ते 18 वयोगटातील मुलांना दिली जाणार आहे. सुमारे आठवडाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लहान मुलांसाठी कोरोना लसीकरणाची घोषणा केली होती. सध्या लहान मुलांसाठी लसीचा एकच पर्याय असेल, तो म्हणजे ‘कोव्हॅक्सीन’.

सुख म्हणजे नक्की काय असतं फेम माधवी निमकरचा सोशल मीडियात धुरळा (photos)

नोंदणीसाठी काय करावे लागेल ?

  1. सर्वप्रथम https://www.cowin.gov.in/ या वेबसाइटवर जा.

2. जर तुम्ही कोविनवर नोंदणी केली नसेल तर तुम्हाला प्रथम नोंदणी करावी लागेल.

3. येथे तुम्हाला मुलाचे नाव, वय अशी काही माहिती द्यावी लागेल.

4. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर, तुमच्या मोबाइलवर एक पुष्टीकरण संदेश येईल.

5. त्यानंतर तुम्ही तुमच्या क्षेत्राचा पिन कोड टाका.

6. लसीकरण केंद्रांची यादी तुमच्या समोर येईल. या केंद्रामधून जवळच्या केंद्राची निवड तुम्ही निवड करू शकता.

7. त्यानंतर तारीख आणि वेळेसह तुमचा लसीकरण स्लॉट बुक करा.

हे सर्व केल्यानंतर तुम्ही लसीकरण केंद्रात जाऊन तुमच्या लहान मुलांचे कोरोना लसीकरण करू शकाल. लसीकरण केंद्रात जाण्यापूर्वी, तुम्हाला ओळखीचा पुरावा आणि गुप्त कोड प्रदान करावा लागेल, जो नोंदणी करताना तुम्हाला मिळालेला असेल.

हनिमूनच्या रात्री बायकोच्या पोटात आली कळ, सत्य समोर येताच नवऱ्याच्या पायाखालची वाळू सरकली!

सरकारी केंद्रावर मुलांचे कोरोना लसीकरण

लहान मुलांचे कोरोना लसीकरण शासकीय केंद्रात केले जाणार आहे. तसेच, तुम्ही एखाद्या खाजगी रुग्णालयातही लहान मुलांचे लसीकरण करून घेऊ शकता. शासकीय लसीकरण केंद्रात लहान मुलांना मोफत लस दिली जाणार आहे. तर खासगी रुग्णालयांमध्ये तुम्हाला लसीची किंमत मोजावी लागणार आहे.

लहान मुलांच्या लसीकरणासाठी सर्व राज्यांनी तयारी केली आहे. लहान मुलांचे लसीकरण ही सध्या अत्यंत गरजेचे आहे. देशात 15 ते 18 वर्षे वयोगटातील सुमारे 80 दशलक्ष मुले आहेत. या सर्व मुलांना लसीकरणाचा लाभ मिळेल आणि लहान मुले कोरोनाविरुद्धच्या लढाईत खंबीर होतील.

Back to top button