Ganesh Utsav 2023 : मंगळागौरीची आरती | पुढारी

Ganesh Utsav 2023 : मंगळागौरीची आरती

Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर श्री गणेशाच्या स्थापनेने गणेश उत्सवचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली.  श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. मिरवणुकांमध्ये लेझीम, दांडपट्टा, ढोल ताशांच्या जोडीला डीजे आणि लेझर शो चा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वत्र गणेश उत्सवाचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह मंगळागौरीची आरती ही गणेश चतुर्थी उत्‍सव काळातील पुजेत म्‍हटली जाते.

Ganesh Utsav 2023 : मंगळागौरीची आरती

जय देवी मंगळागौरी॥ ओवाळीते सोनियाताटी॥
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥धृ.॥

मंगळमूर्ती उपजली कार्या॥ प्रसन्न झाली अल्पायुषी राया॥
तिष्ठली राजबाळी ॥ अयोपण द्यावया ॥१॥

संबंधित बातम्या

जय देवी मंगळागौरी॥ ओवाळीते सोनियाताटी॥
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥धृ.॥

पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या॥ सोळा तिकटी सोळा दुर्वा॥
सोळा परींची पत्री॥ जाई जुई आबुल्या॥ शेवंती नागचाफे॥ पारिजातके मनोहरे॥
गोकर्ण महाफुले॥ नंदेटे तगरे॥ पुजेला ग आणिली ॥२॥

जय देवी मंगळागौरी॥ ओवाळीते सोनियाताटी॥
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥धृ.॥

साळीचे तांदूळ मुगाची डाळ॥ आळणी खिचडी रांधिती नारी॥
आपुल्या पतीलागी ॥ सेवा करिती फार ॥३॥

जय देवी मंगळागौरी॥ ओवाळीते सोनियाताटी॥
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥धृ.॥

डुमडुमे डुमडुमे वाजंत्री वाजती॥ कळावी कांकणे गौरीला शोभती॥
शोभती बाजुबंद॥ कानी कापांचे गबे॥ ल्यायिली अंबा पुजू बैसली ॥४॥

जय देवी मंगळागौरी॥ ओवाळीते सोनियाताटी॥
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती॥ हिरेया मोती ज्योती ॥धृ.॥

न्हाऊनी माखुनी मौनी बैसली॥ पाटावाची चोळी क्षीरोदक नेसली॥
स्वच्छ बहुत होऊनी॥ अंबा पुजूं बैसली ॥५॥

जय देवी मंगळागौरी॥ ओवाळीते सोनियाताटी॥
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥धृ.॥

सोनियाचे ताटी घातिल्या पंचारती॥ मध्ये उजळती कर्पूरीच्या वाती॥
करा धूप दीप॥आता नैवेद्य षड्रस पक्वान्ने॥ ताटी भरा बोने ॥६॥

जय देवी मंगळागौरी॥ ओवाळीते सोनियाताटी॥
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥धृ.॥

लवलाहे तिघे काशीसी निघाली॥ माऊली मंगळागौर भिजवू विसरली॥
मागुती परतुनीया आली॥ अंबा स्वयंभू देखिली॥
देऊळ सोनियाचे॥ खांब हिऱ्यांचे॥ कळस मोतीयाचा॥
जय देवी मंगळागौरी॥ ओवाळीन सोनिया ताटी ॥७॥

जय देवी मंगळागौरी॥ ओवाळीते सोनियाताटी॥
रत्नांचे दिवे माणिकांच्या वाती ॥ हिरेया मोती ज्योती ॥धृ.॥

हेही वाचलंत का? 

Back to top button