Ganesh Utsav 2023 : गणेश चतुर्थीच्या मुहुर्तावर श्री गणेशाच्या स्थापनेने गणेश उत्सवचा प्रारंभ झाला आहे. ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढत गणपत्ती बाप्पा मोरयाच्या जय घोषात श्री गणेशाची घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांमध्ये स्थापना करण्यात आली. श्री गणेश हे विघ्नहर्ता आहेत. त्यांच्या स्थापनेने मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. तसेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. गणरायांच्या आगमनाने नवीन आशा, नवी उमेद, प्रसन्नता निर्माण झाली आहे. सर्वत्र गणेश उत्सवचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे. विघ्नहर्ता बाप्पा सर्वांच्या आयुष्यातील विघ्न दूर करो, हीच प्रार्थना आहे. श्री गणेशाच्या आरतीने गणेश पूजन केले जाते. तसेच गणपतीच्या आरतीसह श्री रेणुका माताची आरती ही गणेश चतुर्थी उत्सव काळातील पुजेत म्हटली जाते.
जय जय जगदंबे । श्री अंबे ।
रेणुके कल्पकदंबे । जय जय जगदंबे ॥धृ ॥
अनुपम स्वरूपाची । बहु दाटी । अन्य नसे या सृष्टी ।
तुजसम रूप दुसरे । परमेष्टी । करीता झाला कष्टी ।
शशी रस रसरसला । वदनपुरी । दिव्य सुलोचन सृष्टी ।
सुवर्णरत्नांच्या । शिरीमुकुटी । लोपती रवि शशी कोटी ।
गजमुख तुज स्तविले । हे अंबे मंगल सकलारंभे ।
जय जय जगदंबे । श्री अंबे । रेणुके कल्पकदंबे ॥१॥
जय जय जगदंबे । श्री अंबे ।
रेणुके कल्पकदंबे । जय जय जगदंबे ॥धृ ॥
कुंकूम चिरी शोभे । मळवटी । कस्तुरी तिलक ललाटी ।
नासिक अतिसरळ । हनुवटी । रूचिरामृत रस ओठी ।
समान जणु लवल्या । धनुकोटी । आकर्ण लोचन भृकुटी ।
शिरी नीट भांगावली । उफराटी । कर्नाटकची दाटी ।
भुजंग नीळ रंगा । परी शोभे । वेणी पाठीवरी लोंबे ।
जय जय जगदंबे । श्री अंबे । रेणुके कल्पकदंबे ॥२॥
जय जय जगदंबे । श्री अंबे ।
रेणुके कल्पकदंबे । जय जय जगदंबे ॥धृ ॥
कंकण कनकाच्या । मनगटी । दिव्य मुदा दशबोटी ।
बाजुबंद जडे । बाहुवटी । चर्चुनी केशर ओठी ।
सुवर्णरत्नाचे । हार कंठी । बहुमोत्यांची दाटी ।
अंगी नवी चोळी । जरीकाठी । पीत पीतांबर तणठी ।
पैंजण पदकमळी । अति शोभे । भ्रमर धावती लोभे ।
जय जय जगदंबे । श्री अंबे । रेणुके कल्पकदंबे ॥३॥
जय जय जगदंबे । श्री अंबे ।
रेणुके कल्पकदंबे । जय जय जगदंबे ॥धृ ॥
साक्षात तू क्षितीजा । तळवटी । तूच स्वयें जग डोही ।
ओवाळीन आरती । दीपदाटी । घेवून करसंपूष्टी ।
करूणामृत हृदये । संकष्टी । धावसी भक्तांसाठी ।
विष्णूदास सदा । बहुकष्टी । देशील जरी निज भेटी ।
तरी मज काय उणे । या लाभे । धाव पाव अविलंबे ।
जय जय जगदंबे । श्री अंबे । रेणुके कल्पकदंबे ॥४॥
जय जय जगदंबे । श्री अंबे ।
रेणुके कल्पकदंबे । जय जय जगदंबे ॥धृ ॥
हेही वाचलंत का?