world hearing day : ‘आयुष्यभर ऐकण्यासाठी, काळजीपूर्वक ऐका’ | पुढारी

world hearing day : 'आयुष्यभर ऐकण्यासाठी, काळजीपूर्वक ऐका'

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

“मी इकडे बोंब मारतोय, तुझे कान कुठे आहेत?”, असा डायलॉग अलिकडे प्रत्‍येक घरात ऐकू येतो. त्‍याला कारणही तसेच आहे. आज हेडफोन कानाला असणे ही काळाची (तंत्रज्ञानाने) निर्माण केलेली गरज आहे. कोणत्‍याही गोष्‍टीचे जसे फायदे तसेच तोटेही असतात. अलिकडे तंत्रज्ञानामुळे आपल्‍या कानावर अतिरिक्‍त ताण पडत आहे. कानाची योग्‍य काळजी घेतली नाही, तर मोठ्या दुष्‍परिणामांना सामोरे जावे लागते. आज ३ मार्च. हा दिवस जागतिक आरोग्‍य संघटना ( WHO) जागतिक श्रवण दिन (world hearing day) म्हणून साजरा करते. यानिमित्त जाणून घेवूया आपल्‍या कानाची काळजी कशी घ्‍यावी, याविषयी…

world hearing day ऐका… पण काळजीपूर्वक आणि सुरक्षित

यावर्षी जागतिक श्रवण दिनाची थीम ‘आयुष्यभर ऐकण्यासाठी, काळजीपूर्वक ऐका’ (To hear for life, listen with care ) अशी आहे. 2021 मध्ये, WHO ने श्रवणविषयक जागतिक अहवाल प्रसिद्ध केला होता, यामध्ये श्रवणशक्ती कमी होणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येवर चिंता व्‍यक्‍त करण्‍यात आली होती. 2022 च्या थीमनुसार, सुरक्षित ऐकण्यावर भर देण्यात आला आहे, जेणेकरून आपण आपले कान सुरक्षित ठेवल्यास आयुष्यभर चांगल्‍या पद्‍धतीने ऐकू शकतो. यामध्ये कानांची सुरक्षितता आणि ऐकण्याची साधने यावर लक्ष केंद्रित केले आहे.

श्रवणक्षमता कमी होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही बालकांमध्ये जन्मजात ऐकण्याची क्षमता कमी असते, तर काही व्यक्तींच्या कानावर आघात झाल्याने, त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर (world hearing day) परिणाम होतो. वयोवृद्धांमध्ये वयोमानानुसार ऐकण्याची क्षमता कमी होत जाते. डायबेटीस ( मधुमेह) असणाऱ्या व्यक्तींच्या कानावर परिणाम होण्‍याची शक्‍यता अधिक असते. सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे ऑफीस काम, गाणी ऐकण्यासाठी हेडफोन, ब्‍लूटूथ वापरले जाते. अशा साधनांमुळे ऐकू येण्‍याच्‍या क्षमतेवर परिणाम होतो. दीर्घकाळ हेडफोनचा वापर करणे कानाच्‍या आराेग्‍यावर दुष्‍परिणाम हाेवू शकताे.

काय आहे Noise induced hearing loss ?

मोठा आवाज संगीत ऐकल्याने कानात असलेल्या लहान केसांची (जे बाहेरच्या आवाजाचे सिग्नल मेंदूला पाठवण्यास मदत करतात) रचना खराब होते. कानात असलेले हे आवरण खराब झाल्याने श्रवणशक्ती कमी होते. तसेच सतत इअरफोन वापरल्यामुळेही कानावर परिणाम होऊन, Noise induced hearing loss होऊ शकतो.

ही काळजी घ्‍या…

  • ८५ डेसिबल (ध्वनी एकक) तुमच्या कानाला हानी पोहचवू शकतो त्यामुळे फोन, म्युझिक प्लेअर, इअरफोन, ब्‍लूटूथचा आवाज कमीत कमी ठेवा.
  • मोबाईल रेडीएशनचा कानावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे वापर नसल्यास, इंटरनेट बंद ठेवा.
  • ब्‍लूटूथ गरजेपुरतेच वापरा, इतरवेळी बंद करून ठेवा.
  • आपल्या आसपासचे, परिसरातील, निसर्गातील आवाज ऐकण्याचा प्रयत्न करा.
  • तुम्‍ही गोंगाटात काम करत असाल तर जाणीवपूर्वक काही काळ या गोंगाटापासून लांब रहा
  • मोठ्या आवाजाच्या ठिकाणी इअरप्लग वापरा.
  • सतत कानात कापूस घालणे टाळा.
  • नेहमी कान कोरडे ठेवा.
  • मानसिक व शारीरिक आरोग्‍य चांगले ठेवण्‍यासाठी नियमित व्‍यायाम करा
  • कानाच्या समस्या टाळण्यासाठी आहारात फळे, हिरव्या पालेभाज्या, दुग्धजण्य पदार्थ, व्हिटॅमिन डी यांचा समावेश करा.

हेही वाचलतं का?

 

 

 

 

 

 

 

Back to top button