सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात नवे खंडपीठ, डिसेंबरमध्ये सुनावणीची शक्यता | पुढारी

सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात नवे खंडपीठ, डिसेंबरमध्ये सुनावणीची शक्यता

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात नवे खंडपीठ स्थापन करण्यात आले आहे. त्यामुळे बुधवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली असून १ डिसेंबर किंवा त्यानंतर सुनावणी होऊ शकते, अशी माहिती देण्यात आली आहे.

सीमाप्रश्नावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार होती. त्रीसदस्य खंडपीठासमोर होणाऱ्या या सुनावणीत मूळच्या कर्नाटकच्या न्यायमूर्ती बी. व्ही. नागरत्ना यांचा समावेश होता. नैतिकतेच्या दृष्टीवर या सुनावणीत त्या सहभाग घेऊ शकत नाहीत. त्याच मुद्द्यावर आता नव्या खंडपीठाची स्थापना झाली असून सुनावणी एक डिसेंबर किंवा त्यानंतर कधीही होऊ शकते, अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.

सीमा प्रश्नावर कर्नाटकच्या अंतरीम अर्ज क्रमांक १२ अ वर निर्णय होणार आहे. यामध्ये कर्नाटकने सीमा वाद सर्वोच्च न्यायालयाच्या अखत्यारीत येऊ शकत नाही, त्यावर सुनावणी घेता येत नाही, न्यायालयाने महाराष्ट्राचा अर्ज रद्द करावा, अशी मागणी केली आहे. या महत्वाच्या सुनावणीकडे महाराष्ट्र आणि सीमावासियांची लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Back to top button