Basmati Rice : केंद्र सरकारने बासमती तांदूळ निर्यातीवरील बंदी उठवली | पुढारी

Basmati Rice : केंद्र सरकारने बासमती तांदूळ निर्यातीवरील बंदी उठवली

पुढारी ऑनलाईन : केंद्र सरकारने मंगळवारी सेंद्रीय नसलेल्या बासमती तांदळाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. यामुळे देशांतर्गत बाजारात बासमती तांदळाच्या किमतीत घट झालेली दिसून आली. यानंतर सरकारने ब्रोकन राईसवरीलदेखील बंदी उठवली आहे. भारत सरकारच्या बंदी उठवण्याच्या निर्णयाने देशांतर्गत बाजारपेठेत बासमती तांदळाचा पुरवठा कमी होऊन, त्याच्या किंमतीत देखील वाढ होऊ शकते.

सप्टेंबरच्या सुरूवातीलाच सरकारने तुकडा तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. देशांतर्गत बाजारपेठेत पुरवठा वाढण्यासाठी सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला होता. भारत सरकारने सेंद्रीय नसलेल्या बासमती तांदळाच्या निर्यातीवर २० टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतला होता. देशांतर्गत बाजारपेठेत तांदळाच्या किमतीतील वाढ रोखण्यासाठी सरकारने या तांदळावरील शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला होता.

विदेशी व्यापार महासंचालक यांनी सांगितले आहे की, सेंद्रीय बासमती नसलेल्या तांदळाच्या निर्यातीवर सप्टेंबरपासून पहिले नियम लागू असतील असे सांगण्यात आले आहे. यामध्ये बासमती तुकडा तांदळाचा समावेश आहे.

हेही वाचा:

Back to top button