बंगळूर : वाढीव आरक्षणाचा अध्यादेश लवकरच : बसवराज बोम्मई | पुढारी

बंगळूर : वाढीव आरक्षणाचा अध्यादेश लवकरच : बसवराज बोम्मई

बंगळूर : पुढारी वृत्तसेवा : अनुसूचित जमातीच्या वाढीव आरक्षणाबाबत अध्यादेश जारी करण्यासाठी राज्यपालांची मंजुरी
मिळाली आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ते म्हणाले, आगामी विधिमंडळ अधिवेशनावेळी दोन्ही सभागृहांत याबाबत मसुदा मांडून त्यावर मंजुरी घेण्यात येईल. कायद्याच्या चौकटीतच आरक्षणाचा निर्णय घेतला आहे. पंचमसाली समाजाला आरक्षणासह विविध समाजांनी वाढीव आरक्षणाची मागणी केली आहे. याबाबत आयोग अंतर्गत चर्चा सुरू आहे. मुस्लिम समाजाचे आरक्षण मागे घेण्याविषयी विनाकारण विधाने केली जात आहेत. त्याविषयी प्रतिक्रिया देणार नाही.

आरक्षण हा संवेदनशील मुद्दा आहे. कोणताही निर्णय घेताना कायद्याचा आधार घेतला जात आहे. सर्व समाजांतील आरक्षणावर चर्चा केली जात आहे. याबाबत स्थापन केलेल्या आयोगाच्या शिफारसीनंतर योग्य निर्णय घेतला जाईल.

वाल्मिकी मठाच्या मठाधीशांनी वाल्मिकी समाजाला वाढीव आरक्षणासाठी उपोषण सुरू केले होते. सरकारने याविषयी अधिसूचना जारी केल्याने मठाधीशांनी आरक्षण मागे घेतले. गेल्या 220 दिवसांपासून ते येथील फ्रीडम पार्कमध्ये उपोषण करत होते. त्यांचे उपोषण रात्रंदिवस सुरू होते.

Back to top button