बेळगाव : चिक्कोडी तालुक्यात पुन्हा जंगली प्राण्यांची दहशत | पुढारी

बेळगाव : चिक्कोडी तालुक्यात पुन्हा जंगली प्राण्यांची दहशत

अंकली (बेळगाव), प्रतिनिधी : चिक्कोडी तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा जंगली प्राण्यांची दहशत सुरू झाली आहे. एका जंगली प्राण्याने वासरावर हल्ला करून शिकार केल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावात घडली आहे.

मंगळवारी रात्रीच्या सुमारास जंगली प्राण्याने इंगळी गावातील शेतकरी कृष्णा जाधव यांच्या 2 वर्षाच्या वासरावर हल्ला केला. वासराच्या पोटाचा काही भाग फाडला. वासराचा मृत्यू झाला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.दरम्‍यान, या संदर्भात शेतकरी अजय माने म्हणाले की, इंगळी गावात जंगली प्राण्यांचा वावर वाढल्‍याने भीती निर्माण झाली आहे. काल रात्री बिबट्या सदृश प्राण्याने हल्ला करून वासराच्या पोटाचा भाग फाडला. त्यामुळे वासराचा मृत्यू झाला.

नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी

इंगळी येथेली पाहणी करण्यासाठी वन अधिकारी श्रीशैल भानसे यांनी भेट दिली. यावेळी ते म्हणाले की, सदर हा बिबट्या नसून बिबट्यासदृश प्राणी असेल किंवा जंगलातील हिंस्त्र प्राणी असेल अशा प्राण्यांकडून जनावरांवर हल्ला होवू शकतो. त्यासाठी नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी व आवश्यक त्या ठिकाणी आपापले जनावरे सुरक्षितस्थळी बांधावीत,असे ते म्‍हणाले.

हेही वाचा

Back to top button