बेळगाव : काळवीटची कातडी जप्त, पाचजण ताब्यात | पुढारी

बेळगाव : काळवीटची कातडी जप्त, पाचजण ताब्यात

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  रात्रीची गस्त घालणार्‍या वनखात्याच्या पथकाने राणेबेन्‍नूर येथे पाचजणांकडून काळवीटची कातडी जप्त केली. बेळगाव वन विभागाच्या पथकाचा कारवाई केली असून एक दुचाकी जप्त करण्यात केली आहे.

बेळगाव विभागाचे मुख्य वनसंरक्षक मंजुनाथ चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षण अधिकारी सुरेश तेली आणि व्ही. डी. हुद्दार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत वन वाहतूक विभागाचे वनाधिकारी अंगडी, उपविभागीय वनाधिकारी डी. आर. हनजी, आय . एम . अक्की, मल्लिकार्जुन मडीवाळर, शरणबसवेश्वर हत्तरकी, रशिद यांनी भाग घेतला. बेळगाव वन विभागाच्या पथकाने हावेरी जिल्ह्यातील राणेबेन्नूर येथे ही कारवाई केली. याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत वन दक्षता पथकाकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यागराज लक्ष्मण लमाणी, गुरुनाथ बसवराज ऐरानी, बीरप्पा नागप्पा मेदथिरी (तिघेही रा. राणेबेन्नूर), थिरुकाप्पा मरियप्पा गोदरा (रा. ब्याडगी), नागप्पा अटकेतील संशयितांसह वन विभागाचे अधिकारी. नागप्पा डिमप्पा हरिजन (रा. बराडी ) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. शनिवारी ( ता. 23 ) हे पाचही जण काळविटाच्या कातडीची विक्री करण्यासाठी प्रयत्नशील होते. वन विभागाच्या दक्षता पथकाला याबाब तची माहिती मिळाल्याने त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 3 काळविटाचे कातडे, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे जप्त करण्यात आली.

Back to top button